दुधाच्या दरामध्ये नेहमी चढ उतार होत असतात जे की दुधळाचे दर एक ते दोन रुपयांनी वाढवतात जे की शेतकऱ्यांना हे दर परवडत नाहीत. मात्र दुधाचे दर परवडत नाहीत म्हणून दर वाढलेत असे कधी झाले नाही तर दरवाढीमागे वेगळीच कारणे आहेत. दुधाचे दर वाढण्यामागे असे कारण आहे की उत्पादनावर होणार खर्च वाढला आहे त्यामुळे दिवसेंदिवस दुधाचे दर वाढत निघाले आहेत. तेलंगणा राज्यातही दुधाचे दर वाढले आहेत. यामुळे असे चित्र पाहावे लागत आहे की उत्पादन खर्च कमी होऊन दुधाचा पुरवठा कमी होत आहे का? दुधाचे दर तसेच उत्पादनावर होणार खर्च व पुरवठा याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
उत्पादनाच्या तुलनेत चाऱ्याच्या किंमती वाढल्या :-
दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च च्या दरम्यान चे वातावरण हे दुधाच्या उत्पादन वाढीसाठी पोषक असते ने की यावर्षी सुद्धा वातावरण पोषकच आहे मात्र चाऱ्याच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने दुधाचे उत्पादन घटले आहे काय असा अंदाज लावलेला आहे. दुधाचा पुरवठा यामुळे तरी कमी होत नाही ना याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
यामुळे महाग होऊ शकते दूध..!
जी दुभती जनावरे आहेत त्यांच्यासाठी कापसापासून बनवलेला सरकीचा चारा सध्या जास्त प्रमाणात वापरला जात आहे जे की या चाऱ्यामुळे दुधात वाढ होत आहे असे शेतकरी सांगतात. मागील वर्षात या चाऱ्यामध्ये ५० ते ६० टक्केनी वाढ झालेली आहे. ५ जानेवारी रोजी कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्स वायदा दरामध्ये सरकीचा दरात प्रति क्विंटल ३३०० रुपये दराची नोंद केलेली आहे जे की मागील वर्षी ५ जानेवारी ला सरकीचा दर २१०० रुपये होता. कापसाच्या सरकीप्रमाणेच मोहरी, सोयापेंड तसेच भुईमूग यांचेही दर वाढले आहेत.
गुजरात राज्याचे सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोधी यांनी सांगितले आहे की गुजरातच्या दूध दरामध्ये ९ टक्केनी वाढ झालेली आहे तर देशात दुधाच्या उत्पादनात ५ - ६ टक्केनी वाढ झालेली आहे. भारत हा असा एकेमव देश आहे जे की यामध्ये सर्वात जास्त दुधाचे उत्पादन होते तर दुसऱ्या बाजूस उत्पादनास लागणाऱ्या खर्चात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
पुरवठा आणि मागणीवरही परिणाम :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुधाचे उत्पादन कमी जास्त होत होते तसेच पुरवठा सुद्धा अनियमित होत असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे दर वाढविले गेले होते जे की याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा न्हवता असे डेअरी कन्सल्टंट डॉ. आर.एस. खन्ना यांनी सांगितले आहे. अमूल डेअरी संघाचे संचालक सांगतात की दुधाच्या उत्पादनाचा खर्च वाढला असल्यामुळे दुधाच्या दरामध्ये वाढ होईल असे म्हणणे जरा घाईत होत आहे त्यामुळे दूध पुरवठा कसा होईल यावर दर ठरविले जातील असे खन्ना यांनी सांगितले आहे.
Published on: 08 January 2022, 01:44 IST