जेव्हापासून ई-पीक पाहणी प्रणाली सुरू झाली तेव्हापासून शेतकऱ्यांना पिकपेऱ्याची नोंदणी करावी लागत आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून ही प्रणाली सुरू आहे. जे की खरीप हंगामात राज्यातील ८४ लाख शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केली आहे. ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांनी उभ्या पिकाचे फोटो तसेच पिकांची खरेदी केंद्रावरच करायची अशी सुविधा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामुळे पिकांची तर नोंद तर होणारच आहेच पण सोबतच खरेदी नोंद देखील होणार आहे. रब्बी हंगामात या प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग वाढवावा तसेच खरेदी केंद्रावर शेतमालाची विक्री करायची असेल तर त्याची सुद्धा सोय ई-पीक पाहणी या मोबाईल अॅपवरून करता येणार आहे.
अँपमध्ये होणार हे बदल :-
सध्या ई-पीक पाहणीच्या प्रणालीतून पिकांची नोंद करता येत आहे. जे की पिकाचे नुकसान झाले तरी पुन्हा पंचनामा करता येतो जे की यासाठी अर्थिक मदतीसाठी पूर्वसूचना संबंधित विभागाकडे द्याव्या लागतात. पूर्वसूचना किंवा पंचनाम्याची सुविधा या ई-पीक पाहणी अॅपमध्ये नाही. मात्र आता पिकाचे नुकसान होताच पिकाचा फोटो अपलोड करण्याची सुविधा अॅपमध्ये दिली जाणार आहे.
खरेदीच्या नोंदणीचीही सुविधा :-
शेतकऱ्यांना जर शेतमाल खरेदी केंद्रावर विकायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्याला महसूल विभागाकडून ‘ई-पीक पाहणी’ अॅपवर भरलेल्या माहितीचाच आधार घ्यावा लागतो. मात्र अॅपमध्ये नोंदणी करण्याची सुविधा नाही. जर आता हरभरा पिकाची ई-पीक पाहणी करून झाली तर सोबतच शेजारी असलेल्या नोंदणी पर्यायावर क्लिक करून खरेदीसाठी नोंदणी करणे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
‘ई-पीक पाहणी’साठी 31 मार्च हीच ‘डेडलाईन’ :-
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची ‘ई-पीक पाहणी’ च्या माध्यमातून नोंद करावी यासाठी सरकारने आतापर्यंत ३ वेळ मुदत वाढवून दिलेली आहे. शेतकऱ्यांचा सहभाग असे असताना वाढत आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदी पूर्वीच्या पद्धतीने होणार आहेत. सध्या हंगाम अंतिम टप्यात आहे त्यामुळे ३१ मार्च पर्यंत पीक नोंद करण्यासाठी मुदत असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर त्यासाठी संबंधित गावाच्या तलाठ्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
Published on: 21 March 2022, 06:05 IST