News

शेतकऱ्यांसाठी खुषखबर आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. रब्बी पिकांसाठी कॅनॉल, बोगदा व उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.

Updated on 29 January, 2022 12:35 PM IST

शेतकऱ्यांसाठी खुषखबर आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. रब्बी पिकांसाठी कॅनॉल, बोगदा व उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे. उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यास मान्यता मिळाली आहे. उजनी धरणात एकूण 121.62 टीएमसी पाणी असून त्यात 57.96 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. आत्ता धरणातील पाण्याची टक्‍केवारी 108.19 टक्‍के इतकी आहे.

मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. शेतीला पाणी टंचाई जाणवणार नाही. सोलापूर शहराला उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही. रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. रब्बी पिकांसाठी कॅनॉल, बोगदा व उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे. रब्बी पिकांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे.

गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारीच्या माध्यमातून खरीप पिकांखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उजनी धरण हे सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. दरम्यान, रब्बीच्या तुलनेत खरीप पिकांखालील क्षेत्र वाढल्याने जलसंपदा विभागाने उजनीतून पाणी सोडवण्याच्या नियोजनात बदल केला आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा विभागाने आता जानेवारी अखेर उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. कॅनॉल, बोगदा, कालव्यातून जवळपास पाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर साधारणत: फेब्रुवारी अखेरीस दुसरे आवर्तन सोडले जाईल, असा अंदाज आहे.

English Summary: Good news for farmers! Approval to for rabbi season from 'Ya' dam
Published on: 29 January 2022, 12:35 IST