News

दिवसेंदिवस बाजारपेठेचे उद्देश बदलत निघाले आहे. ज्या बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आला आहेत त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र आता जो चाळीसगाव बाजार समितीने जो निर्णय घेतला आहे तो बाजार समित्यांसाठी तर चांगला आहेच पण सोबतच शेतकऱ्यांच्या हिताचा देखील आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल भुईकाट्यावर मोजण्यासाठी फी घेतली जाते मात्र यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी गुढीपाडवा पासून करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. १८ फेब्रुवारी पासून बाजार समितीवर अशासकीय प्रधासकीय मंडळ कार्यरत आहे. जो की हा निर्णय मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी घेतलेला आहे.

Updated on 31 March, 2022 4:47 PM IST

बाजार समितीचे घटणार लाखोंचे उत्पन्न :-

चाळीसगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक होते तर हंगामाच्या वेळी तर जास्तच आवक ठरलेली असते. शेतीमाल घेऊन येणारे जे वाहन आहे तसेच त्या मालाचे वजन देखील केले जाते. मालाचे वजन केले की शेतकऱ्यांना त्यांना ५० रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम  द्यावी  लागते. मात्र  आता  ही  जबाबदारी  समितीने  घेतली आहे. बाजार  समितीचे जवळपास ६ लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे. एवढ सर्व असून सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

वजनकाटा हा हमाल व तोलाईदारकडे हस्तांतरित :-

बाजार समितीच्या निर्णयामुळे ६ लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे. प्रशासनातील सर्वांची मंजुरी घेऊन हा निर्णय देण्यात आला आहे. शेतीमाल विकायच्या आधी जी शेतकऱ्यांकडून रक्कम घेतली जात असायची ती आता गुढीपाडवा सनापासून बंद करण्यात येणार आहे. २ एप्रिल पासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी पासून ही अमलबजावणी करण्यात येणार आहे.

‘माझी बाजार समिती’ अ‍ॅपचाही शेतकऱ्यांना फायदा :-

बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी माझी बाजार समिती हे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले होते जे की यावर बाजारात काय दर चालू आहेत हे समजत होते. एवढेच नव्हे तर बाजारात शेतीमालाची आवक तसेच कोणत्या मालाची किती आवक झाली आहे याची सर्व माहिती शेतकऱ्यांना भेटत होती. शेतकरी याचा आधार घेत शेतीमाल साठवून ठेवून दर भेटला की विकायला बाहेर काढत असत. बाजार समितीचे जे छोटे छोटे उपक्रम असतात त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो.

English Summary: Good news for farmers! An important decision taken for the farmers from this year's Gudipadva, know the details
Published on: 31 March 2022, 04:46 IST