भारतीय अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व असणारं क्षेत्र म्हणजे शेती. आज नाही म्हटलं तरी जवळजवळ ६० ते ७०% लोक ही शेती आणि शेतीच्या निगडित व्यवसायांशी संबंधित असतात. शेतकरी बंधूना कृषी तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती मिळावी व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विद्यापीठात सुधारित कृषी तंत्रज्ञानाविषयी सातत्याने संशोधन केले जाते.
राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत व यातील प्रत्येकी एका विद्यापिठास 50 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यासाठी पूर्व नियोजन देखील करण्यात आले आहे. एकूण सहाशे कोटींच्या निधीचे नियोजन करण्यात असून पुढील तीन वर्षासाठी राज्यातील या कृषी विद्यापीठांना महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 50 कोटी, एकंदरीत 600 कोटी रुपये देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी खात्यामार्फत विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये शेतकरी बंधूना कृषी तंत्रज्ञानाबाबत योग्य माहिती अवगत व्हावी तसेच उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक
कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे काम केले जाते. या माध्यमातून कृषी संशोधनाला चालना मिळत आहे. राज्याचा जमिनीचा पोत, पीक, वाण, उत्पादकता, प्रक्रिया यांचा समावेश असलेला असा विभागनिहाय कृषी आराखडादेखील तयार करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
"शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बियाणे तसेच राज्यातील खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खतांचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. सध्या राज्यात बोगस बियाणे विक्रीचे धक्कादायक प्रकार चालू आहेत. जर कोणी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल. जास्त दराने त्याची विक्री करत असेल किंवा बोगस बियाणे-खते शेतकऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल. अशी सूचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी यावेळी केली.
सर्वाधिक मागणी असलेल्या 'महाबीज'च्या सोयाबीन बियाणांची 30 किलोच्या बॅगेची किंमत मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन हजारांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे 34 तलाव तयार करण्यात येणार आहे. यातील 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते शनिवारी झाले.
तेंव्हा आयोजित केलेल्या कार्यक्रमात दादाजी भुसे बोलत होते. सर्वाधिक मागणी असलेल्या 'महाबीज'च्या सोयाबीन बियाणांची 30 किलोच्या बॅगेची किंमत ही मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन हजारांनी वाढली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ऑनलाइन पोर्टल बंद असल्यानं हरभऱ्याची खरेदी थांबवण्यात आली. मात्र येत्या दोन दिवसात याचाही प्रश्न मार्गी लागणार असं आश्वासन दादाजी भुसे यांनी दिले.
दरम्यान हरभरा खरेदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले होते. "यंदा हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना जवळजवळ 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. त्यामुळे हरभऱ्याची खरेदी ही 28 जून 2022 पर्यंत वाढवावे अशी केंद्र सरकारला त्यांनी विनंती केली असून हरभऱ्याच्या खरेदीची अंतिम तारीख 29 मे 2022 असून तारीख वाढवण्याबाबतच्या निर्णयाला एक-दोन दिवसात मंजूरी देणे अपेक्षित असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
कांदा चाळीत साठवायचा आहे! तर 'हे' तीन तंत्रे राहू द्या कायम लक्षात,कांदा टिकेल दीर्घकाळ
Published on: 30 May 2022, 10:19 IST