नवीन मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येतं आहे. राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ठाकरे सरकार लवकरच 50 हजार रुपये पाठवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ठाकरे सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेतला होता. महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत ठाकरे सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती.
याशिवाय त्यावेळी ठाकरे सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा देखील केली होती. मात्र मध्यंतरी कोरोना व त्यानंतर डबघाईला आलेली राज्य शासनाची अर्थव्यवस्था पाहता ते काही शक्य झाले नाही.
मात्र आता लवकरच राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपये दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची आता यादी मागवली जात असून यासंबंधित आवश्यक सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती सहकार विभागाने नुकतीच सार्वजनिक केली आहे.
मित्रांनो राज्यातील 20 लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी 2022-23 या आर्थिक वर्षात 10 हजार कोटींची तरतूद राज्य शासनाद्वारे केली गेली आहे विशेष म्हणजे राज्य शासनाने या संदर्भात अर्थसंकल्पात तरतूद केली होती.
यासोबतच भूविकास बँकेच्या सुमारे ३५ हजार कर्जदार शेतकऱ्यांना 1 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. निश्चितच राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी लवकरच येणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 29 May 2022, 09:22 IST