काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावला होता. सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत अनेक दिवस शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठिकठिकानी आंदोलने केली. बरेच दिवस बाजार समित्या या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. मात्र आता कांद्यावर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क मागे घेण्यात आले आहे. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क केंद्राकडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढली आहे.
मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर नवीन नियम लावले आहेत. कांदा इतर देशात निर्यात करण्यासाठी 800 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्य लागू राहणार आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत हे निर्यातशुल्क लागू करण्यात येणार आहेत,यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कांद्याचा साठा संपू नये, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, भाव स्थिर रहावे या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.
सध्या शेतकऱ्यांकडील कांद्याचा साठा संपत आल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामळे कांदा दरात झपाट्याने वाढ होत आहे. घाऊक बाजारासह किरकोळ बाजारातील कांद्याचे दर 100 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क मागे घेण्यात आलं असलं तरीही निर्यात करण्यासाठी 800 डॉलर मेट्रिक टन ही किंमत अनिवार्य करण्यात आली आहे.
Published on: 29 October 2023, 03:30 IST