News

भारताचा दुग्ध व्यवसायात जगात वरचा नंबर लागतो. यामुळे देशात अनेक जातींच्या गाई आणि म्हशी आहेत. याला चालना देण्यासाठी सरकार अनेक विविध योजना आणत असते. तसेच दुग्ध व्यवसायिकांना अनेक प्रकारची मदत देखील केली जाते. आता आसाममधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सौराष्ट्रातील उच्च दूध उत्पादन देणाऱ्या १५ हजार गीर गायी आसामला देण्यात येणार आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आता याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated on 15 January, 2022 11:56 AM IST

आसाम सरकार दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि आसाम सरकारमध्ये सामंजस्य करार झाला आहे. याद्वारे या गीर गाई देण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या गायींची आयातही वाढविली जाणार आहे. जागतिक बँक अनुदानित आसाम कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवहन प्रकल्पांतर्गत पूरबी डेअरी विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली. ज्यामुळे दूध उत्पादन क्षमता ६० हजारावरून दीड लाख लिटर प्रतिदिन होणार आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे ही योजना फायदेशीर ठरणार आहे. यामधून अनेकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्द होणार आहे. 

येथील शेतकऱ्यांचे उपन्न आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात दररोज ३८ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पुढील सात वर्षांत सहा नवीन दूध प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. चार हजाराहून अधिक सहकारी दूध संघांमधील दुधाला सहा नव्या नियोजित दूध प्रक्रिया केंद्रांमध्ये प्रक्रिया, पॅकेजिंग आणि दूध विक्री केली जाईल. यामुळे इतर तरुणांना देखील रोजगार उपलब्द होणार आहे. 

तसेच आसाममध्ये पशुखाद्य आणि मुरघास उत्पादनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन पशुखाद्य आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पही उभारण्यात येणार आहेत. आसाम सरकारचा हा एक मोठा प्रकल्प आहे. यासाठी सरकारने मोठी गुंतवणूक केली आहे. आता लवकरच १५ हजार अधिक दूध देणाऱ्या गीर गायी आसाममध्ये आणल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वकांशी योजना आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

English Summary: Good news for farmers !! 15,000 Gir cows will be given to boost dairy business ...
Published on: 11 January 2022, 06:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)