News

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या घसरत्या दराने विटा ग्रस्त केले होते परंतु आता आजच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चांगली वाढ होताना दिसत आहे.सोयाबीन दरवाढीचा मागच्या दिवसातला आलेख बघता सोयाबीनच्या दरात दररोज शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ होत आहे.

Updated on 26 November, 2021 12:29 PM IST

 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या घसरत्या दराने विटा ग्रस्त केले होते परंतु आता आजच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चांगली वाढ होताना दिसत आहे.सोयाबीन दरवाढीचा मागच्या दिवसातला आलेख बघता सोयाबीनच्या दरात दररोज शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ होत आहे.

यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती चा विचार केला तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 3720 क्विंटल सोयाबीनची आवकझाली. यावेळी सोयाबिनला तब्बल आठ हजार तीनशे कमाल  दर मिळाला तर किमान दर  हा सहा हजार किमान दर मिळाला. जर सरासरीचा विचार केला तर सात हजार एकशे पन्नास रुपये दर मिळाला.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अजूनही सोयाबीनचे दर वाढतील अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

 लातूर मध्ये सोयाबीनचे दर स्थिर

 लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर स्थिर पाहायला मिळत आहेत.

सध्या लातूर बाजारपेठेची उलाढाल ही सोयाबीनच्या दरा भोवती फिरते आहे. यातच गेल्या दहा दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कायम वाढ होत आहे. दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपयांची वाढ होताना असताना लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हे 6450 वर स्थिरावले आहेत.

 अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनला चांगला दर

अकोला बाजार समितीमध्ये अगोदरपासूनच सोयाबीनचे दर हे अगोदर पासूनच चांगले निघाले होते. अकोला बाजार समितीने सोयाबीनलाअकरा हजार तीनशे रुपये हा मुहूर्ताचा दर जाहीर केला होता. त्यामध्ये कालांतराने कमालीची घट झाली होती.

बुधवारी याच बाजार समितीमध्ये गणेश साकुंदकर या  बाभुळगाव येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. या शेतकऱ्यांनी 12 पोते सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. सोयाबीन ते चांगल्या प्रतीचे असल्याने हा दर मिळाला आहे. तसे पाहता सोयाबीनला सरासरी दरहा सहा हजार चारशे रुपये चालू आहे.

( संदर्भ – हॅलो कृषी )

English Summary: good news for farmer soyabioen rate is continuosly growth
Published on: 26 November 2021, 12:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)