News

शेतकरी ज्या एका गोड बातमीची वाट बघत होता तीच बातमी आता समोर येत आहे

Updated on 15 May, 2022 2:42 PM IST

शेतकरी ज्या एका गोड बातमीची वाट बघत होता तीच बातमी आता समोर येत आहे.केरळ, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘असनी’ चक्रीवादळ आता शांत होत आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांकरिता पोषक वातावरण तयार होत असून, त्यामुळे विनाअडथळा माॅन्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. अंदमान निकोबारमध्ये 26 मे रोजी माॅन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, माॅन्सूनची प्रगती वेगानं होताना दिसत आहे. 

 येत्या 48 तासांत माॅन्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात 26 मे रोजी माॅन्सून दाखल होणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने आधी व्यक्त केला होता. मात्र, आता पुढील 2 दिवसांतच माॅन्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढचे 2-3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या काळात हवामान कोरडे राहील

केरळात वेळेआधीच माॅन्सून

पुढील 48 तासांत अंदमान- निकोबार बेट, अंदमानचा समुद्र आणि मध्य- पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग माॅन्सून व्यापणार असल्याचे समजते. माॅन्सूनचा वेग चांगला असल्याने, यंदा केरळात वेळेआधीच माॅन्सून दाखल होणार आहे.

पुढील 4 आठवड्यांत देशभरात पावसाला सुरुवात होईल. पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. 

दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर व यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. 14) वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियसची नोंद झाली होती. महाबळेश्वर येथे राज्यातील निच्चांकी 29.7 अंश सेल्सियसची कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा 3.5 ने कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे.

English Summary: Good news for farmer mansun coming in 48 hours bangal
Published on: 15 May 2022, 02:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)