(Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक मदत केली जावी तसेच हंगामात पीक लागवडीसाठी आर्थिक मदत व्हावी, शेतकरी बांधवांना पिकाची पेरणी करण्यासाठी कुठलेही सावकारी कर्ज (Lending) उचलण्याची वेळ येऊ नये या हेतूने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने (Ahmednagar Co-operative District Bank) एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅंकेच्या या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक तसेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले (Shivajirao Kardile) यांनी नुकतीच एक संचालक मंडळाची बैठक घेतली होती. संचालक मंडळाच्या बैठकीत शिवाजीराव यांनी पीक कर्जाची (Crop loan) मर्यादा वाढविण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावात एकरी 20 हजार रुपये असलेली मुदत 30 हजार करण्यात यावी अशी मागणी होती. या प्रस्तावास संपूर्ण संचालक मंडळाने बहुमताने पारित केले. शिवाजीराव कर्डिले यांच्या या प्रस्तावाला संचालक मंडळाचा पाठिंबा मिळाल्याने बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी हा प्रस्ताव मान्य केला.
जिल्हा बँकेच्या ज्या सभासदांनी मार्च अखेर आपल्या जुन्या पीक कर्जाची परतफेड केली असेल आता त्यांना नवीन हंगामासाठी 15 एप्रिल पर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच जिल्हा बँकेत सुरु असलेली खेळते भांडवल योजनेचे कर्ज कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे जिल्हा बँकेत द्वारे दिली जाणारी ही दोन्ही कर्ज अल्प व्याजदरात शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिली जात असल्याने अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशांची मोठी मदत होते.
कोरोना सारख्या महाभयंकर आजारातदेखील जिल्हा बँकेने आपल्या सभासदांसाठी कर्जाची सोय करून दिली होती. आतादेखील पीक कर्जात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा बॅंकेच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे म्हणून संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी मार्चअखेर शेतकऱ्यांना कर्जफेड करण्याचे आव्हान केले आहे तसेच एप्रिल मध्ये या पीक कर्जाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे देखील नमूद केले आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या आवाहनाला जिल्हा बँकेचे सभासद निश्चीतच प्रतिसाद देतील व नियमित कर्जफेड करून बँकेद्वारे पीक कर्जात दिलेली वाढ याचा फायदा घेतील. बँकेच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठे आर्थिक सहाय्य होणार असल्याचे देखील शेतकरी बांधव स्पष्ट करीत आहेत.
संबंधित बातम्या:-
Published on: 31 March 2022, 05:50 IST