आंतरराष्ट्रीय कामगार दिनाआधिच कामगारांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आली असून शेतकरी आणि ऊसतोड मजूर यांच्यासाठी महामंडळ स्थापण्याची घोषणा राज्याचे कामगार मंत्री यांनी केली आहे. केंद्राच्या कायद्यांमुळे कामगार संकल्पना मोडीत निघाल्याचे सांगत राज्य सरकार कामगार हिताला बाधा पोहचवणार नसून त्याची काळजी घेण्यात येणार असल्याचे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
शिवाय येत्या वर्षभरात शेतमजूर, वाहनचालक, यंत्रमागधारक, ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन करून असंघटित कामगारांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणू असे हि आश्वासन ग्राम विकास तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुणवंत कामगार पुरस्कार सोहळ्यात दिले. अलीकडे संघटित क्षेत्रात कंत्राटी कामगारांची भरती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दिलासादायक ! महिन्याभरात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार, असे केले आहे नियोजन...
कामगारांना कामावर नियमित केले जात नाही, किमान वेतन दिले जात नाही, अशा अनेक समस्यांना कामगारांना तोंड द्यावे लागते. एखाद्या कामगाराने ठराविक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम केल्यावर त्याला कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी कठोर कायदे करून त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. संघटित कामगार कंत्राटी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हि पावले उचलत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात नुकताच ३४ वा 'गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील ५१ गुणवंत कामगारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कामगार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री बच्चू कडू, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर आणि कामगार उपस्थित होते.
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
राज्यात ४ कोटींहून अधिक असंघटित कामगार आहेत. त्यांना कामगार म्हणून कोणतेही विशेष लाभ मिळत नाहीत. या सर्व असंघटित कामगारांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याची जबाबदारी कामगार विभागाची आहे. याआधी माथाडी, सुरक्षारक्षक, बांधकाम मजूर, घरेलू कामगारांसाठी महामंडळे स्थापन केली; उर्वरित घटकांसाठी महामंडळे स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पावले उचलली आहेत. येत्या वर्षभरात शेतमजूर यंत्रमागधारक, ऊसतोड कामगारांचे महामंडळ करू असे मुश्रीफ म्हणाले.
कौतुस्कास्पद ! "शेतकऱ्याची लेक झाली अधिकारी"
शेतमजुरासह इतर कामगार दिवसरात्र काबाडकष्ट करून सुद्धा कामगारांच्या हाती पुरेशी रोजंदारी पडत नाही. जातीच्या आधारावर योजना आणण्याऐवजी कष्टकरी समाजाला चांगले दिवस येण्यासाठी श्रमावर आधारित योजना आणायला हव्यात, कारण कामगार थांबले तर देश थांबेल असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मांडले.
वीज तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारची धडपड; ऊर्जामंत्र्यांचा छत्तीसगढ दौरा
Published on: 21 April 2022, 05:30 IST