शेती हा असा व्यवसाय आहे ज्यात अमाप कष्ट आहेत. पारंपरिक शेती करताना तर अधिक कष्ट आणि सुयोग्य नियोजन हे लागतेच. मात्र आता शेतकरी बंधू पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती करण्याकडे वळला आहे. आधुनिक शेतीतून अल्प वेळात अधिकाधिक नफा मिळण्याची शक्यता असते. अशाच अल्पावधीत अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणार पीक म्हणजे काळी हळद.
काळ्या हळदीची शेती (Black Turmeric Farming) केल्यास भरपूर उत्पन्न अगदी अल्पावधीतच मिळू शकतं. याविषयी मनीकंट्रोलवर अधिक माहिती देण्यात आली आहे. काळी हळद ही अत्यंत औषधी मानली जाते. काळ्या हळदीचा अत्यंत महागड्या औषधी उत्पादनांमध्ये समावेश होतो. तसेच काळी हळद अत्यंत औषधी गुणांनी युक्त असल्याने त्याची किंमतही भरपूर असते.काळ्या हळदीची लागवड ही विशेष कालावधीदरम्यान केली जाते. सहसा काळ्या हळदीची शेती ही जून महिन्यात केली जाते. काळ्या हळदीची शेती करताना मातीचे महत्व अधिक आहे.
या शेतीचे उत्पन्न भुरभुरीत चिकणमातीत चांगल्या प्रमाणात येतं. या पिकाचं उत्पादन घेताना शेतात पावसाचं पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वसाधारणपणे एक हेक्टरमध्ये काळ्या हळदीचं 2 क्विंटल बी पेरलं जातं. विशेष म्हणजे या शेतीसाठी जास्त सिंचनाची आवश्यकता भासत नाही. काळ्या हळदीमध्ये असलेल्या औषधी गुणांच्या वैशिष्ट्यामुळे तिला कीड लागत नाही. त्यामुळे कीटकनाशकाचीही गरज लागत नाही. काळ्या हळदीसाठी पोषक वातावरण तर लागतेच शिवाय नैसर्गिक खतांचा वापर केल्यास अधिक प्रमाणात फायदा होतो.
विशेष करून शेण खताचा वापर काळ्या शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यातून भरघोस उत्पादन हमखास मिळू शकतं.एका एकरामध्ये काळ्या हळदीचं पीक घेतल्यास त्यातून ५० ते ६० क्विंटल हळद म्हणजेच जवळपास १२ ते १५ क्विंटल कोरडी हळद सहज मिळते. या शेतीतून उत्पादन जरी कमी मिळालं तरी त्यातून होणारी कमाई मात्र भरपूर असते. ही काळी हळद 500 रुपयांपर्यंत अगदी सहजपणे विकली जाते. अनेक शेतकऱ्यांनी तर काळी हळद 4000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंतही विकली आहे. सध्या डिजिटल मुळे ऑनलाईन वेबसाईट्सवर तर काळी हळद ५०० रुपये ते ५००० रुपयांपर्यंत विकली जाते.
तुम्ही जर या काळ्या हळदीला ५०० रुपयांचा दर लावला तरी १५ क्विंटलमधून ७.५ लाख रुपयांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.काळ्या हळदीच्या शेतीबाबत पूर्वनियोजन तसेच त्यासंदर्भातील पूर्णपणे नीट माहिती करून घेतल्यास शिवाय त्याचं नीट व्यवस्थापन केल्यास तुम्हाला थोड्याशा उत्पादनातून भरघोस कमाई मिळेल. शेतकरी बंधू शेतीत असेच विविध पिकं घेऊन आणि आपल्या अफलातून कल्पनेतून यासारख्या बऱ्याच पिकांची लागवड करत असतात.
महत्वाच्या बातम्या;
LPG Cylinder Price: महागाईचे सत्र सुरूच; महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
2017 मधील प्रकरण! द्राक्ष व्यापाऱ्याने केली होती अठरा लाखांची फसवणूक, न्यायालयाने सुनावली दोन वर्ष कारावासाची शिक्षा
काळ्या रंगाचा मका देखील येतो? जाणून घेऊ कोणत्या हंगामात करतात याची लागवड
Published on: 01 May 2022, 10:58 IST