गगनाला भिडलेल्या खाद्य तेलाच्या किमती नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकारने खाद्य तेलाची आयात शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
.केंद्र सरकारने या आयात शुल्कभरघोस म्हणजे 5.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तोंडावर येऊ घातलेल्या सणासुदीच्या दिवसांमध्ये देशातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
जर मागच्या वर्षापासून तेलाच्या किमतीचा विचार केला तर तब्बल 50 टक्क्यांनी त्या वाढल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर सरकारने आयात शुल्कात घट करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारने येत्या 30 सप्टेंबरपर्यंत कच्च्या तेलावरील आयात शुल्क 30.25 टक्क्यांवरून 24.7 टक्क्यांपर्यंत केले आहे. तसेच रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क 41.25 टक्क्यांवरून 35.75टक्क्यांवर आणल आहे. तसेच रिफाइन्ड सोया तेल आणि सनफ्लावर तेलावरील आयात शुल्क देखील 30 सप्टेंबर पर्यंत 45 टक्क्यांवरून 37.5टक्क्यापर्यंत कमी केलेआहे.
खाद्य तेलाच्या वाढत्या किमती यांच्या पार्श्वभूमीवर जे कोणी तेलाचा साठा करत असतील अशा साठेबाजांवर कडक कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. तसेच केंद्राकडून राज्यांना सूचना देण्यात आले आहेत की देशातील सर्व खाद्यतेल उत्पादक कंपनी आणि होलसेल व्यापाऱ्यांकडूनतेलाचे साठेबाजी केली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
Published on: 11 September 2021, 06:57 IST