News

मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीला चांगलाच दर मिळत आहे. महत्वाचे म्हणजे किरकोळ बाजारभावाचा उतार सोडला तर गेल्या महिन्याभरापासून मिरचीचे दर तेजीत आहेत.

Updated on 11 October, 2022 10:39 AM IST

मिरची उत्पादक (Chilli growers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीला चांगलाच दर मिळत आहे. महत्वाचे म्हणजे किरकोळ बाजारभावाचा उतार सोडला तर गेल्या महिन्याभरापासून मिरचीचे दर तेजीत आहेत.

मिरचीला प्रतिक्विंटलला (per quintal) कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळत आहे. असे बाजार समितीकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची आवक प्रतिदिन ३ ते ५ क्विंटल राहिली आहे.

पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई; 'या' टोल फ्री नंबरवर करा कॉल

सर्वाधिक १८ हजार ५०० रुपये दर

लाल मिरचीची आवक प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध भागातूनच होतेच, पण सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा या भागातून होते. पण गेल्या महिना-दीड महिन्यापासून आवकेत सातत्याने घट होत आहे. याचे कारण म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत मिरची लागवड कमी झाली आहे.

गेल्या पंधरवड्यापासून तर मागणी आणि आवकेतील तूट वाढत आहे. त्यामुळे दरात तेजी वाढत आहे. गतसप्ताहात मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १० हजार रुपये ५०० रुपये, सरासरी १२ हजार ५०० रुपये आणि सर्वाधिक १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाला.

पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर; 7 लाख रुपयांचा होणार फायदा, फक्त हे एकच काम करा

मात्र असे असताना लसूण, कांद्याचे दर मात्र काहीसे स्थिर राहिले आहेत. लसूण आणि कांद्याची आवक मात्र वाढली. सणाला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर कांद्याला किमान १०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा, मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या
16 ऑक्टोबरनंतर वृषभ, सिंह राशीसह या लोकांची चिंता वाढणार; जाणून घ्या राशीभविष्य
शेतकऱ्यांनो मोहरीच्या 'या' सुधारित वाणाची करा शेती; मिळेल दुप्पट फायदा

English Summary: Good news chilli growers Per quintal getting much 18 thousand 500 rupees
Published on: 11 October 2022, 10:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)