News

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.खरीप हंगामात खराब हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

Updated on 08 November, 2023 3:29 PM IST

ही विमा रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यासाठी विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विमा कंपन्यांची बैठक घेऊन सरसकट अग्रीम पीकविमा देण्याबाबत भूमिका घेतली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. या सर्वांचेच धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना केल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्याला किती पीकविमा मिळणार -
सांगली - शेतकरी लाभार्थी - 98,372 (रक्कम - 22 कोटी 4 लाख)
बीड - 7,70,574 (रक्कम - 241 कोटी 21 लाख)
बुलडाणा - 36,358 (रक्कम - 18 कोटी 39 लाख)
धाराशिव - 4,98,720 (रक्कम - 218 कोटी 85 लाख)
नाशिक - 3 लाख 50 हजार (रक्कम - 155.74 कोटी)
जळगाव - 16,921 (रक्कम - 4 कोटी 88 लाख)
अहमदनगर - 2,31,831 (रक्कम - 160 कोटी 28 लाख)
सोलापूर - 1,82,534 (रक्कम - 111 कोटी 41 लाख)
सातारा - 40,406 (रक्कम - 6 कोटी 74 लाख)
नागपूर - 63,422 (रक्कम - 52 कोटी 21 लाख)
लातूर - 2,19,535 (रक्कम - 244 कोटी 87 लाख)
अमरावती - 10,265 (रक्कम : 8 लाख)
अकोला - 1,77,253 (रक्कम - 97 कोटी 29 लाख)
कोल्हापूर - 228 (रक्कम - 13 लाख)
जालना - 3,70,625 (रक्कम - 160 कोटी 48 लाख)
परभणी - 4,41,970 (रक्कम - 206 कोटी 11 लाख)
एकूण - लाभार्थी शेतकरी संख्या - 35,08,303 (मंजूर रक्कम : 1700 कोटी 73 लाख)

English Summary: good news; 1700 crore advance crop insurance sanctioned to 35 lakh farmers in the state
Published on: 08 November 2023, 03:29 IST