News

गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ होत आहे. दुपारी उन्हाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्याने लोक रसाळ फळ सेवनाला पसंती देत आहेत.

Updated on 28 February, 2022 4:50 PM IST

गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ होत आहे. दुपारी उन्हाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्याने लोक रसाळ फळ सेवनाला पसंती देत आहेत. सध्या मुंबई APMC मार्केटमध्ये देखील कलिंगड आणि टरबूज फळाला मागणी वाढू लागली आहे. ऐन उन्हाळ्यात फळ मार्केटमध्ये ५० हुन अधिक गाडी कलिंगड आणि टरबूज विक्रीला आले आहेत.

मात्र सध्या अजून पाणीदार फळांचा हंगाम सुरु नसल्याने आज मार्केटमध्ये जवळपास २५ ते ३० गाडी कलिंगड आणि १० गाडी टरबुजाची आवक झाली आहे. उद्या येऊ घातलेल्या महाशिवरात्री उपवासामुळे देखील बाजारात ग्राहक वाढल्याचे दिसत आहे.

मुंबई फळ मार्केटमध्ये द्राक्ष, स्ट्रॉबेरी आणि सफरचंद अशी फळे येत असली तरी कलिंगड आणि टरबुजाला मागणी वाढू लागल्याचे कलिंगड व्यापारी हरिप्रसाद चौरसिया यांनी सांगितले की, सध्या कलिंगड १५ ते २० रुपये प्रतिकिलो तर टरबूज २२ ते २५ रुपये प्रतिकिलो ने विकले जात आहे.

महत्त्वाची बातमी : ब्रेकिंग: ...तर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा

राज्यात पाच ते सहा लाख टन उसाचे गाळप शिल्लक; कारखाने बंद होण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

मागणी वाढू लागल्याने कलिंगड शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. कोरोना काळातील दोन वर्षांमध्ये झालेल्या नुकसानीची झळ यावर्षी बसू नये अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. झालेल्या नुकसानीची थोडीफार भरपाई व्यावर्षी निघून येईल अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

मागील वर्षी ऐन हंगामात कोरोना दुसरी लाट असल्याने शेतकऱ्यांचे मोठे झाले होते. त्या दरम्यान आवक मध्ये देखील घट झाली होती. तर त्या कोरोना निर्बंधांमुळे ग्राहक कमी झाले होते. त्यामुळे गेली दोन वर्षांपासून कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत.

English Summary: Good day to Kalingad and watermelon so much increase in price
Published on: 28 February 2022, 04:50 IST