देशातील सरकारी नोकरदार (Government Employees) वर्गासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येतं आहे. सरकारी नोकरीं (Central Government Employees) करणारे निवृत्त तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने आता अच्छे दिन येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Central Government Employees DA) मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी (7th Pay Commission) होणार आहे.
सरकारच्या (Central Government) या निर्णयाचा जवळपास देशातील सव्वा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सरकारी नोकरदार वर्ग मोठा आनंदी बघायला मिळतं आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने देशातील जवळपास सव्वा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच DA मध्ये 4 टक्क्याने वाढ केली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आता DA 34 टक्क्यांऐवजी 38 टक्के दिला जाणार आहे. सध्या याविषयी कोणतेच अधिकृत विधान सरकारकडून करण्यात आलेले नाही. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.
प्रसारमाध्यमात वेगाने पसरत असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार येत्या ऑगस्टपर्यंत याविषयीची मोठी घोषणा करणार आहे. सरकारने जर हा निर्णय घेतला तर याचा लाभ 47 लाख केंद्रीय कर्मचारी वर्गाला होणार असून जे सेवानिवृत्त झाले आहेत अशा 68 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे.
म्हणजेचं या निर्णयाचा राज्यातील सव्वा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सेंट्रल गव्हर्नमेंट ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षभरात दोनदा वाढ करत असते.
यामुळे सध्या प्रसारमाध्यमात या चर्चेला उधाण आले आहे. अजून याविषयी कोणतीच औपचारिक माहिती सार्वजनिक केलेली नसली तरीदेखील जुलै ते डिसेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारकडून वाढ केली जात असल्याने लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार असल्याची शक्यता आहे. निश्चितच यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 23 May 2022, 09:58 IST