राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना अवकाळी पावसातून वाचलेल्या फळबागा आणि भाज्या टिकवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. यामुळे आता भाज्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. आता टोमॅटोला देखील चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. यामुळे राहिलेला माल शेतकरी औषधे मारून टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे आता महागाईच्या झळा सहन करणाऱ्यांना सामान्यजणांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे.
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. असे असताना आता टोमॅटोचे सध्याचे दर हे ८० रुपये किलोपर्यंत पोहचू लागले आहेत. अशातच येत्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात अजून वाढ होऊन ते गगनाला भिडण्याची चिन्ह आहेत. राज्यात आलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम सर्वांवर होणार आहे. तसेच इतर भाज्या देखील महाग होण्याची शक्यता आहे. यामुळे नुकसानीतून बाहेर पडण्याची शेतकरी याकडे लक्ष देऊन आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळा तसेच हॉटेल देखील कोरोनामुळे बंद आहेत, यामध्ये स्थिरता नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या भाज्यांना बाजार नाही.
या आठवड्यात वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाचा मोठा फटका हा नाशिकमधील द्राक्ष, कांदा यासोबतच टोमॅटो पिकाला बसला आहे. टोमॅटोच्या बागेत पाणी साचले असून टोमॅटोला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी तर टोमॅटो गळून पडला आहे. या सर्व परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत आहेत. तर, दुसरीकडे टोमॅटोच्या पिकाला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. यामुळे चांगले दर मिळतील यासाठी शेतकरी आशावादी आहेत. मात्र पिके टिकवण्यासाठी पावसामुळे मोठा खर्च देखील वाढला आहे.
याचा परिणाम सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक जवळपास 50 टक्क्याने घटली असून भावही 40 ते 50 टक्क्यांनी पडलेत. त्यातच पावसामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी नसल्याने मालाला मागणी नाही. बाजार समितीत येणाऱ्या पालेभाज्या आणि इतर माल पावसामुळे येऊ शकला नाही आणि पावसाचा जोर कायम राहिला तर, भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आहेत त्या भाज्या जर टिकवल्या तर येणाऱ्या काळात त्याचे चांगले पैसे होतील.
Published on: 22 January 2022, 10:34 IST