News

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत

Updated on 05 April, 2022 2:32 PM IST

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक 18/04/2022 ते 30/04/2022 या 13 दिवसांच्या कालावधीत स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्यासाठी बांबू व त्यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण हे सलग 13 दिवस असून सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत होईल.

एकूण ३५ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात लँपसेट, फुलदाणी, चहाचा ट्रे, लेटर बॉक्स, मोबाईल स्टेंड, पेन स्टेंड, कंदील, इ. शिकविले जाणार आहेत. 

सदर प्रशिक्षण हे मोफत असून चहा नाष्टा जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणासाठी 18 ते 45 वयोगटातील रत्नागिरी जिल्यातील दारिद्रय रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज भरण्यासाठी येताना 1 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स, मतदानकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान

यांचेमार्फत देण्यात येणारे शिफारस पत्र, दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला. हे सर्व कागद पत्र कार्यालयीन वेळेत खालील पत्त्यावर घेवून येणे. दिनांक 12/04/2022 या तारखेपर्यंत सायंकाळी 05 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांनी 13/04/2022 या दिवशी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहणे. प्रशिक्षणाचा, अर्ज भरण्याचा आणि मुलाखतीचा पत्ता - स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साई नगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव. रत्नागिरी. 

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक 18/04/2022 ते 30/04/2022 या 13 दिवसांच्या कालावधीत स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्यासाठी बांबू व त्यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण हे सलग 13 दिवस असून सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत होईल. एकूण ३५ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात लँपसेट, फुलदाणी, चहाचा ट्रे, लेटर बॉक्स, मोबाईल स्टेंड, पेन स्टेंड, कंदील, इ. शिकविले जाणार आहेत. 

 शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी. 11 ते सायंकाळी 05 या वेळेत 9284034438 / 02352 - 299191 क्रमांकावर संपर्क करणे .

English Summary: Golden opportunity to get free training in making bamboo and various ornaments from it
Published on: 05 April 2022, 02:29 IST