News

सध्याच्या काळात महिला पुरुषां इतक्याच स्वतः आत्मनिर्भर आहेत. आजघडीला महिलासुद्धा आपणहून व्यवसाय सुरू करीत आहेत. यासाठी त्या अनेक प्रकारच्या बिझनेस आयडिया हाताळत आहेत. आणि यामध्ये दररोज आम्ही तुमच्यासाठी नव्या बिझनेस आयडिया घेऊन येत आहोत. त्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

Updated on 14 October, 2020 5:43 PM IST


सध्याच्या काळात महिला पुरुषां इतक्याच स्वतः आत्मनिर्भर आहेत. आजघडीला महिलासुद्धा आपणहून व्यवसाय सुरू करीत आहेत. यासाठी त्या अनेक प्रकारच्या बिझनेस आयडिया हाताळत आहेत. आणि यामध्ये दररोज आम्ही तुमच्यासाठी नव्या बिझनेस आयडिया घेऊन येत आहोत. त्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

घरबसल्या ५ ते १० हजार रुपयांत सुरू करा हे व्यवसाय

आज अशी स्थिती आहे की मार्केटमध्ये पैसे नाहीत आणि नोकरीही नाही. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर अशा काळात थोडी गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही एखाद्या गावात किंवा छोट्या शहरात राहात असाल तरीही या संधी आहेत. सद्यस्थितीत पाहिले तर असे अनेक व्यवसाय आहेत, जे आपल्या घरात बसून सुरू करता येतील आणि आपल्या कुटूंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास उपयोगी ठरतील.

महिलांसाठी बिझनेस आयडियाज्

अशा प्रकारच्या छोट्या व्यवसायांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, यामध्ये ज्यादा गुंतवणुकीची गरज नाही. फक्त तुम्ही यासाठी थोडा वेळ देण्याची गरज आहे आणि थोड्याशा मेहनतीची गरज आहे. आज आपण महिलांसाठी अशा काही घरबसल्या करू शकतील अशा व्यवसायाच्या संकल्पना घेऊन आलो आहोत, त्यासाठी घरात बसून निवांतपणे त्या काम करू शकतील. कमी कालावधीत जादा लाभ मिळवता येऊ शकेल. चला जाणून घेऊया असे कोणते व्यवसाय आहेत ते...

 


शिवणकाम

याशिवाय जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिवणकामाचे रुपांतरही व्यवसायात करू शकता. जर तुम्हाला कपडे शिवता येत असेल तर टेलरिंग बिझनेस सहजपणे आपल्या घरीच सुरू करू शकता. लोकांचे कपडे शिवण्यापासून ते इच्छूक तरुणी, युवतींना कपडे शिवण्याचे प्रशिक्षणही देऊ शकता. यापासूनही कमी कालावधीच चांगली कमाई करता येते. 

 


लोणचे आणि तूप विक्री

जर तुम्ही घरात बसून काही काम करू इच्छिता तर घरबसल्या लोणचे आणि तूप विक्रीपासून याची सुरुवात करू शकता. घरगुती पद्धतीने बनवलेले लोणचे आणि तुपाला लोकांकडून अधिक पसंती दिली जाते. बाजारपेठेत याला अधिक मागणी असल्याने खरेदीही केली जाते. हा एक असा व्यवसाय आहे की, जो कधीही करता येऊ शकतो. जर तुम्हाला लोणचे आणि तूप बनवायला येत असेल तर तुम्ही हे तयार करून विक्रीही करू शकता आणि ऑनलाईन विक्रीचीही संधी उपलब्ध आहे. त्याद्वारे तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

 


केक आणि स्नॅक बनविण्याचा व्यवसाय

याशिवाय, तुम्ही जर शक्य असेल तर केक, स्नॅक्स बनविण्याचा व्यवसायही सुरू करू शकता. अनेकदा महिलांना नवनवे खाद्यपदार्थ बनविण्याची हौस असते. अशा महिलांसाठी हा व्यवसाय खूप उपयुक्त आणि मजेदार बनू शकतो. त्या घरातच राहून केक, स्नॅक्स बनवू शकतात. या पदार्थांची सहजपणे ऑनलाईन विक्रीही करता येऊ शकते. याची सुरूवात तुम्ही केक, स्नॅक्सची ऑर्डर तुमची कॉलनी, अपार्टमेंटमधूनही घेऊनही सुरू करू शकता. आणि हळुहळू आपल्या परिसरात केक, बेकरी शॉपमध्येही याची विक्री करू शकता. यापासून तुम्ही कमी कालावधीत चांगला नफा कमवू शकता.

 


मेहंदी रंगविणे

जर तुम्हाला वाटले तर तुम्ही मेहंदी लावणे/रंगविण्याचा व्यवसायही सुरू करू शकता. काही महिला, युवतींना मेहंदी लावणे खूप आवडते. त्यांना या कामाची आवडही असते. त्यामुळे तुम्ही आपल्या घरातूनही या कामाला सुरुवात करू शकता आणि यापासून चांगली कमाई करू शकता. याशिवाय तुम्ही आपले प्रोफाईल बनवून ऑनलाइन व्यवसायही सुरू करू शकता. कारण हा एक असा व्यवसाय आहे की, तो प्रत्येक सिझनमध्ये सुरू राहू शकतो. याची मागणी सण, समारंभांच्या निमित्ताने अधिक असते.

English Summary: Golden Opportunity for Women: Start a these business for Rs. 5,000 to Rs. 10,000 at home
Published on: 14 October 2020, 05:43 IST