शेती क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन परिषदसारख्या संस्था विविध प्रकारच्या संशोधनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात संशोधन करून मोलाची भूमिका पार पाडत आहेत.
यामध्ये कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, विविध पिकांचे नवनवीन वाण इत्यादी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. याच धर्तीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेनेभाताचे नवीन वाण तयार केले आहे.आता भात लागवडीचा विचार केला तर विदर्भ आणिएकंदरीत भारताच्या बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.आता खरीप हंगाम तोंडावर असताना बऱ्याच प्रमाणात भाताची पेरणीकेली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर या नवीन वानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याची संधी आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केले हे वाण
भारतीय कृषी संशोधन परिषदेने आठ वर्ष खूपच मेहनत घेऊनगोल्डन आडव्हान्स हे भाताचे नवीन वाण तयार केले आहे. तसे पाहायला गेले तर हे वाण मागच्या वर्षी प्रदर्शित करण्यात आले होते परंतुया खरीप हंगामापासून ते वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.भाताच्या इतर वाणांच्या तुलनेतगोल्डन अडव्हांस या वाणांची उत्पादकताजास्त आहे.
यापासून 55 क्विंटल एकरी उत्पादन मिळण्याचा अंदाजभारतीय कृषी संशोधन परिषदेने व्यक्त केला आहे.तसेच हवामान बदल हा सर्वात मोठी कृषी क्षेत्रासमोरील समस्या आहे. ह्या हवामान बदलाचा देखील या वानावर परिणाम होणार नाही तसेच कमी पाण्यात येणारे हे वाण असल्याचेविश्वास देखील व्यक्त केला जात आहे.संपूर्ण देशाची भौगोलिक परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवूनया वाणाची निर्मिती करण्यात आली आहे.या वाणाबद्दल आय सी आर ने अधिक माहिती देताना म्हटले की,गोल्डन वाण हे श्रेणीसुधार केलेले आहे.बिहार,पश्चिम बंगाल,महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि ओरिसा मधील शेतकरीया वाणाची लागवड करू शकतात. 10 ते 15 जूनच्या दरम्यान या वाणाची पेरणी करता येईल.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना आता दरमहा मिळतील 3 हजार रुपये मात्र करावे लागेल 'हे' काम
नक्की वाचा:मोठी बातमी! वैज्ञानीकांनी विकसित केली कांद्याची सुधारित जात; वाचा सविस्तर
Published on: 02 May 2022, 09:06 IST