गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. यामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे आवक कमी झाली. कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट 200 रुपयांना विकली जात आहे. कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये (Nashik) 'भाव' खात असून सोन्याच्या भावाने विकली जात आहे.
ऐन सणाच्या काळात कोथिंबिरीचा भाव वाढला
आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. जवळपास 160 रुपये जुडी एवढा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मिळत असून बाजारात 200 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत.
नियमित आवकेच्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 20 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन 120 ते 160 रुपये किलोपर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
नाशिक शहरासह मुंबई आणि गुजरातमध्ये येथून भाजीपाला पाठवला जातो. गेल्या तीन-चार दिवसांपासून कोथिंबीर आवक घटल्याने कोथिंबीर जुडीला सोन्याचा भाव मिळत आहे. त्याचबरोबर इतर भाजीपाला दर देखील वाढले आहेत.
पितृपक्षात भाजीपाला आवक कमी होती म्हणून भाव वाढले होते. आता मात्र सगळाच भाजीपाला महाग झाल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: 29 September 2022, 08:00 IST