Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजार सोने चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळतो. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात घट करण्याची शक्यता वर्तवल्यानंतर आणि मिडल ईस्टमध्ये तणाव असल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी वाढ झाल्याचे समोर आलं आहे. यामुळे आज सोन्याच्या दरात 650 रुपयांनी घसरण झाली आहे. इराण आणि सौदी अरेबियात राजकीय परिस्थित बिघडत चालली असल्यामुळे याचा परिणाम सोन्यावर होऊ लागला आहे. तसंच आगामी काळात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
गुड रिटर्ननुसार, आज मंगळवारी सोन्याच्या दरात 650 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 74,510 इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 68,300 रुपये इतका आहे. चांदीच्या किंमतीत आज 2,000 रुपयांपेक्षा अधिक घट झाली आहे.
जगातील अनेक प्रमुख केंद्रीय बँका सोनं खरेदी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यात प्रामुख्याने चीन, भारत आणि रशिया यांचाही समावेश आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाच्या वाढत्या कर्जामुळंही सोन्याच्या दरात वाढ होत आहे. याच कारणामुळं सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत असल्याने दरात रोज चढउतार पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या लग्नीन सराई सुरु असल्याने सोने खरेदी करताना नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. वाढत्या सोन्याच्या दरामुळे नागरिक सध्या चिंतातूर आहेत.
Published on: 21 May 2024, 12:17 IST