नवी मुंबई: सध्या देशभरात लग्नसोहळ्यांचा सीजन सुरु आहे. राज्यात सर्वत्र लगीनघाई बघायला मिळतं आहे. लगीन घाई सुरु असल्याने सर्वत्र सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये सोनं खरेदीसाठी उत्सुकता आहे.
जर तुमच्याही कुटुंबात लग्न असेल तर सोने-चांदी खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. आजकाल सर्वोच्च पातळीपासून सोन्याची सुमारे 5 हजार रुपयांनी स्वस्तात विक्री होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यास उशीर करू नका.
दिल्लीसह या राज्यांमधील सोन्याचे दर जाणून घ्या
भारतीय सराफा बाजारात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,090 रुपये इतका नोंदवला गेला. एक किलो चांदीचा भाव कालच्या 61,500 रुपयांवरून 650 रुपयांनी वधारून 62,150 रुपयांवर पोहचले आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्ज यासारख्या कारणांमुळे सोन्याचा दर दररोज बदलतो.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकाता येथे 22 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 47,750 रुपयांना विकले जात आहे. तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 47,800 रुपयांना विक्री होत आहे.
24 कॅरेट 10 ग्रॅम सोने कोलकत्ता मुंबई आणि नवी दिल्लीत 52,090 रुपयांना विकले जात आहे. तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे 24 कॅरेट शुद्धतेचे 10 ग्राम सोने 52,150 रुपयांना विकले जात आहे.
बिहारची राजधानी पाटणा आणि सुरतमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 47,850 आणि 47,780 रुपय असल्याचे सांगितलं गेलं आहे. 24 कॅरेट शुद्धतेचे 10 ग्राम सोने पटनामध्ये 52,190 रुपये आणि सुरतमध्ये 52,120 रुपये आहे.
हैदराबाद, बंगळुरू आणि केरळमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,750 रुपयांवर पोहोचला आहे. मंगळुरू, म्हैसूर आणि विशाखापट्टणममध्ये 22 कॅरेट शुद्धताचे 10 ग्राम सोने 47,750 रुपयांना विकले जात आहे. तथापि, वरील सर्व भागात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 52,090 रुपयांना विकले जात आहे.
नाशिक आणि चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव अनुक्रमे 47,850 आणि 47,900 रुपयांवर आहे. याशिवाय 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याची किंमत नाशिकमध्ये 52,190 रुपये आणि चंदीगडमध्ये 52,240 रुपये आहे. कोईम्बतूर आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,800 आणि 47,850 रुपये असल्याचे सांगितले गेलं आहे.
Published on: 28 May 2022, 11:44 IST