गावाकडची पोरं शहरात येवून किती पगार मिळवतात, 15000 ते 20000 फार तर फार लाखभर रुपये. मात्र, अहमदनगरमधल्या पाथर्डीसारख्या दुष्काळी भागात दोन तरुण महिन्याला तब्बल कोट्यवधी रुपये कमवतात. आता तुम्ही म्हणाल कसे, या दोन्ही मित्रांना गरिबांच्या गायीमुळे इतका पैसा मिळत आहे. शेळीला गरिबांची गाय म्हटलं जातं. हे दोन्ही मित्रांनी शेळीपालनाचा व्यवसायातून बक्कळ पैसा कमावला आहे.
अहमदनगरच्या या दोन युवा शेतकऱ्यांनी 10 वर्षांपूर्वी सरकारी नोकरी सोडून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आज वर्षाला तब्बल 12 कोटी 54 लाख रुपये कमवत आहेत.
शेळीपालनातून इतके पैसे कसे मिळतात?
शेळ्यांच्या विक्रीतून 12 कोटी, लेंडीखताच्या विक्रीतून 18 लाख, शेळीपालन कसं करावं हे शिकवण्याच्या मानधनापोटी 36 लाख रुपये इतके उत्पन्न या तरुणांना मिळते.अशक्य वाटणार हे उत्पन्न दोन युवा शेतकरी मिळवत आहेत. राहुल खामकर आणि सतीश एडके असे या तरुणांचे नावे आहेत. जिथं घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते, त्या अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डीत कृषी सहाय्यक असणाऱ्या राहुल खामकरने सरकारी नोकरीला रामराम केला आणि मित्राच्या साथीनं मातीत उतरला.20 शेळ्यांपासून व्यवसाय सुरू झाला.
हळूहळू शेळ्या वाढल्या. एक-एक करत तेरा जातीच्या शेळ्या शेडमध्ये आल्या. तेरा जातींसाठी वेगवेगळी कंपार्टमेंट तयार केली. करडे, शेळ्या आणि बोकडांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. करडांची विक्री सुरू केली. आज फक्त आफ्रिकन भोर जातीच्या शेळ्यांची ते विक्री करतात आणि त्यातनं ते कोट्यवधी रुपये कमवत आहेत.
वीस शेळ्यांपासून व्यवसायाला सुरुवात
वीस शेळ्यांपासून सुरू झालेल्या या व्यवसायाची आज कंपनी झाली. आज इथे तब्बल 750 शेळ्या आहेत. आणि सरासरी एक ते दीड हजार किलोच्या दरानं वर्षाकाठी तब्बल 4 हजार करडांची विक्री हे दोघे करतात. शेळीचे दूध लेंडीखत यांचीही विक्री होते. प्रयोगाच्या अनुभवातून प्रशिक्षणाकडे मोर्चा वळला आणि अतिरिक्त उत्पादनही मिळू लागले.
विशेष म्हणजे या शेळ्या आणि बोकडांची विक्री करण्यासाठी सतीश एडके यांच्या मुलगा प्रतीकने स्वतः सॉफ्टवेअर तयार करून मार्केटिंगला सुरुवात केली आहे.सतीश आणि राहुल महिन्याला तब्बल 8 लाख रुपये मिळवतात. शहरात मोठ्या कंपनीत आणि मोठ्या पदावर काम करुनही इतकं उत्पन्न मिळत नाही.
Published on: 19 February 2021, 08:46 IST