1. बातम्या

शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षण संपन्न

शिरवळ: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 27 ते 29 फेब्रुवारी 2020 कालावधीत शेतकरी, शेळीपालक व बेरोजगारांसाठी आधुनिक शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

KJ Staff
KJ Staff


शिरवळ:
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 27 ते 29 फेब्रुवारी 2020 कालावधीत शेतकरी, शेळीपालक व बेरोजगारांसाठी आधुनिक शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रक्षेत्र विभागप्रमुख डॉ. गोकुळ सोनवणे तसेच डॉ. भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेळीपालनाबाबत शेळ्यांना होणारे आजार व त्यावरील उपचार, शेळ्यांचे आहार, गोठा व्यवस्थापन व शेळ्यांचा चारा तसेच शेळ्यांची निवड, शेळ्यांचे विपणन, बकरी ईदच्या बोकडांची तयारी बाबत प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या तज्ञांनी मार्गदर्शन केले.

यात डॉ. आमले, डॉ. जाधव, डॉ. मोटे, डॉ. खानविलकर, डॉ. नांदे, डॉ. लंबाते, डॉ. पवार तसेच डॉ. शलाका यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रक्षेत्रावरील भेटीत आधुनिक तसेच कमी खर्चात शेळीचा गोठा कसा उभारायचा, प्रथमोपचार आणि शेळीचे वय दातावरून ओळखणे याशिवाय अझोला लागवड व त्याची मशागत यावर डॉ. कदम तसेच डॉ. भोकरे यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रातून जसे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, सांगली, अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांमधून एकूण 29 प्रशिक्षणार्थी आले होते.

सर्व प्रशिक्षणार्थींना पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर माणिकराव धुमाळ यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यास डॉ. गोकुळ सोनवणे, डॉ. भोकरे, डॉ. विजय कदम, श्री. शामकांत महाजन, श्री. निलेश तळपे, नितीन कदम श्री. चुन्‍नीलाल ठाकरे व कर्मचारी बाळासाहेब मोटे यांनी अथक परिश्रम घेतले.

English Summary: Goat farming training conducted at krantisinh nana patil college of veterinary science shirwal Published on: 01 March 2020, 01:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters