गोव्यात लवकरच नवीन कृषी आणि फलोत्पादन विद्यापीठ स्थापन होणार आहे, राज्यात कृषी महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. जून २०२२ पर्यंत नवीन कृषी महाविद्यालय गोवा विद्यापीठांतर्गत स्थापन केले जाईल.
विद्यापीठाच्या स्थापनेसाठी गोवा सरकार महाराष्ट्रातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्याशी सामंजस्य करार करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.नवीन कृषी महाविद्यालय गोवा विद्यापीठाचा भाग असेल. त्याच्या स्थापनेच्या दिशेने राज्य सरकार काम करत आहे, सावंत यांनी कॉलेज जूनपर्यंत तयार होईल असे सांगितले आहे.
"गोव्यातील अनेक विद्यार्थी देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये कृषी, फलोत्पादन, वनशास्त्र आणि इतर कृषी विषयांचे शिक्षण घेत आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही गोवा विद्यापीठांतर्गत गोव्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करत आहोत," असे मुख्यमंत्री म्हणाले.
जुन्या गोव्यात कृषी अर्थशास्त्र विषयावरील २४ व्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र सोसायटी फॉर अॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दोन्ही आयोजकांनी गोव्यातील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गोव्यात केंद्रीय कृषी विद्यापीठाची मागणी केली. राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली, आयसीएआर-सीसीएआरआय आणि गोवा कृषी संचालनालयाच्या प्रमुखांची नवीन संस्थेच्या ब्लू प्रिंटवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.
महत्वाच्या बातम्या
Health News : रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्य येणार धोक्यात
शेतकरी बंधूंनो!NPK आहे पिकांचा आत्मा, जाणून घेऊ NPK चे पीक वाढीतील महत्व
Published on: 07 May 2022, 12:54 IST