गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

Monday, 18 March 2019 08:29 AM


गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे वय 63 वर्षे होते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या मागे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

13 डिसेंबर 1955 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पर्रिकर यांची सामाजिक कारकिर्द संघाचे प्रचारक म्हणून सुरू झाली. आयआयटी, मुंबईतून त्यांनी धातुशास्त्रात अभियंता पदवी घेतल्यानंतरही ते संघाचे काम करीत राहिले. संघाशी असलेले संबंध त्यांनी कधी लपवले नाहीत. ते संघाच्या संचलनातही सहभागी होत.

शनिवारी पर्रीकर यांची प्रकृती अतिशय बिघडली होती. दोनापावल येथील त्यांच्या खासगी निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. यापूर्वी गोव्यासह मुंबई आणि अमेरिकेतही त्यांनी उपचार घेतले होते. या उपचारानंतर गेले वर्षभर निवासस्थानीच उपचार सुरू होते. शनिवारी त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवले होते. त्यांचा रक्तदाबही खूपच कमी झाला होता. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक प्रयत्नांची शर्थ करत होते; परंतु यश आले नाही. अखेर रविवारी सायंकाळी पर्रीकर पर्व संपले.

मुंबई आयआयटी इंजिनीअर असलेले पर्रीकर संरक्षणमंत्री असतानाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. ते गोव्याचे तीनदा मुख्यमंत्री होते.

मनोहर पर्रीकर Manohar Parrikar

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.