देशात असणारे पोषक वातावरण व गव्हाचे वाढते उत्पादन या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत. कारण येईल या पुढच्या दोन महिन्यात देशामधून २० लाख टन पेक्षा जास्तच गव्हाची निर्यात केली जाणार आहे.ही निर्यात मागील ७ वर्षातील सर्वात मोठी निर्यात असणार आहे. जागतिक बाजारपेठेत गव्हाला(wheat) वेगळेच महत्व प्राप्त होणार आहे करण की इतर देशांपैकी भारतातील गव्हाची किमंत स्पर्धेत राहते त्यामुळे येथील गहू खरेदी केला जातो.परकीय कृषी सेवा विभागाने व अमेरिकेच्या कृषी विभागाने ताज्या अहवालात भारताच्या गव्हाच्या निर्यातीचा अंदाज लावलेला आहे जो की ४० लाख ५० हजार टनांवरून ५२ लाख ५ हजार टनांवर गेला आहे.भारत देश चांगल्या दर्जाचा आणि वाजवी किमतीत गव्हाचा पुरवठा करत आहे.
भारतामधून या देशामध्ये निर्यात:-
अमेरिकन कृषी विभागाने असे म्हणले आहे की ऑगस्ट महिन्यात भारताचा गहू निर्यातीच्या किमती १९ हजार ८८९ रुपये होत्या मात्र शेजारच्या देशांना निर्यात केला असल्याने मालवाहतुकीचा फायदा कमी झाला.बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेशिया आणि पश्चिम आशियातील देशांना सध्या भारत गहू निर्यात करत आहे. नेपाळमध्ये भारत वाहनाणे गव्हाची निर्यात करतो. इतर देशातील गव्हाची निर्याती किमतीचा विचार केला तर गव्हाची किमंत २६ हजार ८६८ रुपये एवढी आहे.
नवीन निर्यात सौदे होताच गव्हाच्या किंमती वाढतात:-
भारताचा गहू सर्वात जास्त खरेदी करणारा देश म्हणजे बांगलादेश आणि नंतर क्रमांक लागतो तो श्रीलंका आणि नेपाळचा. एप्रिलच्या कापणीवेळी MSP पेक्षा कमी असलेल्या निर्यात सौदयामुळे गव्हाची किमंत वाढली आहे. ज्यावेळी कापणी चालू होती त्यावेळी १५०० रुपये प्रति क्विंटल ने गहू विकला गेला तर सध्या १९५० रुपये गहू चालू आहे.
कृषी व जे प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने आहेत त्याची निर्यात विकास प्राधिकरनाच्या आकडेवाडीनुसार वर्षाच्या सुरुवातीस गव्हाची निर्यात 20 लाख 34 हजार टन झाली होती ज्याची किमंत ४ हजार ५९० कोटी रुपये होती.
Published on: 28 November 2021, 06:53 IST