सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कापसेवाडीत कृषीनिष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन कापसे यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी शरद पवार हे कापसेवाडीत आले होते. यावेळी द्राक्ष उत्पादकांसह, केळी, टोमॅटो उत्पादकांचे विविध प्रश्न यावेळी शरद पवारांजवळ शेतकऱ्यांनी मांडले आहे. त्याचबरोबर शाळेला जाण्यासाठी रस्ता करून मिळावा यासाठी कापसेवाडी येथील विद्यार्थ्यांनी शरद पवारांना निवेदन दिल आहे.
या कार्यक्रमावेळी साहेब आम्हाला न्याय द्या, शाळेला रस्ता द्या असे फलक हातात घेवून विद्यार्थी रस्त्यावर उभे होते. माढा तालुक्यातील टाकळी गावातील काळे वस्तीचे विद्यार्थींना अनेक वर्षांपासून शाळेपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्यात या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते. त्यामुळे वारंवार ग्रामपंचायतीकडे मागणी करुनही शाळेकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला नाहीये.
पोलिसांनी विद्यार्थ्यांना भेटू न दिल्यानं शेवटी एका मुलाने गाडीमागे पळत जावुन, शरद पवार यांना शाळेला जाण्यासाठी रस्ता करून मिळावा यासाठी निवेदन दिल आहे. त्यानंतर विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन शाळेसाठी रस्ता तयार केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
Published on: 17 November 2023, 01:39 IST