News

एगनेक्स्ट टेक्नॉलॉजीज या भारतातील आघाडीच्या कृषी तंत्रज्ञान कंपनीने नाफेड सोबत भागीदारी करून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेतकरी उत्पादक संघटनांसाठी डाळीच्या दर्जाच्या मूल्यमापनासाठी वर्च्युअल प्रशिक्षण आणि जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते एगनेक्स्टनेपाच एफपीओ सोबत भागीदारी केली आहे.

Updated on 25 January, 2022 5:42 PM IST

एगनेक्स्ट टेक्नॉलॉजीज या भारतातील आघाडीच्या कृषी तंत्रज्ञान कंपनीने नाफेड सोबत भागीदारी करून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेतकरी उत्पादक संघटनांसाठी डाळीच्या दर्जाच्या मूल्यमापनासाठी वर्च्युअल प्रशिक्षण आणि जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते एगनेक्स्टनेपाच एफपीओ सोबत भागीदारी केली आहे.

यामध्ये व्हीसीएमएफ, मार्कफेड, महाएफपीसी, पृथाशक्ती आणि वापिको यांचा समावेश आहे. या माध्यमातून जेणेकरून आगामी खरेदीच्या कालावधीत डाळींच्या आणि विशेषतः तूरडाळीच्या दर्जाबाबत जागरूकता निर्माण होऊ शकेल. या सत्रात एफपीओ मधील प्रमुख लोक सहभागी होते. हे महाराष्ट्रातील जवळपास चाळीस हजार ते पन्नास हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतील.

 या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट

तूर डाळीसाठी बाजारातील विविध दर्जा निकषांबाबत एफपीओना प्रशिक्षित करायचे होते. या मूल्यमापनाच्या आधारे या उत्पादनाला दर्जा दिला जाऊनबाजारात त्याची किंमत निश्चित होते.प्रत्यक्ष  मूल्यमापन निकषांचे प्रत्यक्षात प्रदर्शन करण्यात आले. जेणेकरून सहभागींना तुकडा झालेली,खराब झालेली, कच्ची, आकाराने लहान झालेली किंवा तनाने ग्रस्त डाळ ओळखणे, नमुना मधील आद्रता तपासणे, त्यातील नकोसे घटक ओळखणे आणि इतर अत्यावश्यक निकषांचा समावेश आहे.

सहभागींना एगनेक्स्टचे प्रत्यक्ष दर्जा मूल्यमापन उपकरण स्पेसएक्स विसियो कशाप्रकारे तूर डाळीचे नमूने तात्काळ ओळखू शकते आणि एका मिनिटांपेक्षा कमी वेळेत प्रत्यक्ष दर्जा तपासू शकते हे दाखवण्यात आले. एगनेक्स्ट टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक श्री.तरणजीत सिंग भामरा म्हणाले की, अन्न दर्जा तपासणी च्या पारंपारिक पद्धती मध्ये मानवी चुका होण्याची शक्यता असते.अंतिमतायाचा प्रभाव व्यापाराच्या वेळी उत्पादनाच्या किमतीवर पडू शकतो. उत्पादनाच्या दर्जाच्या निकषांबाबत जागृकता व समज असल्याने शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे व्यापार करणे आणि अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होईल. 

त्याचवेळी शेतकऱ्यांच्या दारात आणि बाजारात तंत्रज्ञानावर आधारित सर्वोत्तम पद्धतीमुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादकता पुढील कालावधीत सुधारणे शक्य होईल.कृषी उद्योजक, उत्पादक संस्था आणि शेतकरी यांच्यामध्ये नियमित प्रशिक्षण आणि ज्ञानाचा देवाणघेवाणीचे सत्रे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी पर्यावरणात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वाढीव अंगीकार होऊ शकेल.

English Summary: give training to five farmer production company by naafed
Published on: 25 January 2022, 05:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)