रायगड आणि अलिबाग जिल्ह्यातील शंभर वर्षाच्या आधीपासून पांढरा कांदा लागवडीचे परंपरा आहे. या पांढऱ्या कांद्याला बुधवारी दिनांक 29 रोजी जी आय मानांकन देण्याच्या बाबतीत केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून मौखिक स्वीकृती देण्यात आली आहे.
हा जीआय अलिबागच्या पांढरा कांदा उत्पादक संघाच्या नावाने प्राप्त झाला असून या अभूतपूर्व यशामुळे अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कांद्याला आता देशासह जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान मिळवणं शक्य जाणार आहे.
महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या कांद्याच्या जातींचे लागवड केली जाते परंतु त्यापैकी आकाराने आकर्षक गोल, गोड चवीचा आणि विविध औषधी गुणधर्मांनी युक्त म्हणून या काद्याची ओळख आहे. अलिबाग तालुक्यांमध्ये या खांद्याखाली लागवड क्षेत्र हे 14 हजार ते 15 हजार हेक्टर आहे.
पांढरा कांदा चवीला गोड आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे या कांद्याला बाजारपेठेत फार मोठी मागणी असते. मुंबई,ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील बाजारात चढ्या दराने याची विक्री केली जाते. अलिबाग भागांमध्ये भात कापणी झाल्यानंतर लगेच या कांद्याची लागवड केली जाते.
साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हा सुरुवातीला हा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते.दर्जेदार कॉलिटी असलेल्या कांद्याला 75 रुपये किलो असा दर मिळतो. अलिबाग परिसरातील शेतकरी भातशेती नंतरचे दुबार पीक म्हणून पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात.
Published on: 01 October 2021, 09:59 IST