News

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या गंभीर होत चालला आहे. सभासदांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये सध्या असाच काहीसा प्रकार सुरु आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन सुरु केले आहे. परिसरात सभासदांच्या उसाला तुरे आले असताना देखील कारखान्याकडून गेटकेन ऊस आणला जात आहे.

Updated on 27 January, 2022 12:33 PM IST

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या गंभीर होत चालला आहे. सभासदांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये सध्या असाच काहीसा प्रकार सुरु आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन सुरु केले आहे. परिसरात सभासदांच्या उसाला तुरे आले असताना देखील कारखान्याकडून गेटकेन ऊस आणला जात आहे. कारखाना चालू होऊन चार महिने झाले तरी आडसाली ऊस तोडला जात नाही. त्यातच महावितरणकडून विज तोडली आहे. यामुळे ऊस जळू लागले आहेत. यामुळे उसाला हुमणी देखील लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुरू आहे. यामुळे जोपर्यंत सभासदांचा ऊस तोडला जात नाही, आणि गेटकेन ऊस बंद होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे नानासाहेब निंबाळकर यांनी सांगितले आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

यामुळे येणाऱ्या काळात यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सभासद सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारखाना आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. यामुळे बाजारभाव देखील कमी दिला जात आहे. असे असताना आता सभासदांच्या ऊसतोडीला प्राधान्य देखील दिले जात नाही. यामुळे ऊस रानातच जळू लागला आहे. त्यातच हुमणी आणि महावितरणमुळे मोठे नुकसान सुरू आहे. यामुळे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, कारखान्याचा सभासद हा कारखान्याचा मालक म्हणून ओळखला जातो, मात्र त्याच्यावर सध्या अन्याय सुरु आहे, असे नानासाहेब निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, आयसीआरचे संचालक रामचंद्र निंबाळकर, शेतकरी संघटनेचे अमरसिंह कदम, शिवाजीराव निंबाळकर, विशाल निंबाळकर तसेच शेतकरी उपस्थित होते. याबाबत कारखाना जोपर्यंत निर्णय घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या शेतकरी उपस्थित करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात तरी यावर तोडगा निघणार का हे लवकरच समजेल.

English Summary: Give priority sugarcane members, careless management sugarcane, farmers' indefinite holding agitation started.
Published on: 27 January 2022, 12:33 IST