News

पेनटाकळी प्रकल्पावरील देवदरी शिवारातील मोटारपंपाचे तांब्याच्या वायरची झाली चोरी.

Updated on 20 March, 2022 12:50 PM IST

पेनटाकळी प्रकल्पावरील देवदरी शिवारातील मोटारपंपाचे तांब्याच्या वायरची झाली चोरी.

चिखली-भोरसा भोरसी येथील१७ शेतकरी यांचे शेतीपंपाचे तांब्याचे केबल (वायर)दि १७मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यानी पळवल्याची घटना समोर आली आहे.तर शेतकऱ्याना न्याय देण्यात व चोरट्यांना गजाआड करण्यात यावे,अशी मागणी भोरसा भोरसी येथील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी दि१८मार्च २०२२रोजी अमडापुर पोलीस स्टेशन गाठुन पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील भोरसा भोरसी येथिल शेतकरी देवदरी शिवारातील पेनटाकळी प्रकल्पातुन पाणी उपसा करतात दरम्याण 

१७/०३/२०२२रोजीच्या रात्री देवदरी या शिवारतुन भोरसा भोरसी येथील एकुण १७ शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे तांब्याचे वायर,स्टाटर अज्ञात चोरटे यांनी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.तर यामधे काहिंचे १००,२००,व ३००फुट ताब्यांचे वायर चोरीस गेले असुन शेतकऱ्यांचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याने या केबल,स्टाटर चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर या प्रकरणी तपास करुण शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा,व चोरट्यांना गजाआड करण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी अमडापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

याचा तपास ठाणेदार यांनी बिट अमलदार तोंडे यांच्याकडे दिला असुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.भोरसा भोरसी येथिल शेतकरी देवदरी शिवारातील पेनटाकळी प्रकल्पातुन पाणी उपसा करतात दरम्याण १७/०३/२०२२रोजीच्या रात्री देवदरी या शिवारतुन भोरसा भोरसी येथील एकुण १७ शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे तांब्याचे वायर,स्टाटर अज्ञात चोरटे यांनी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.तर यामधे काहिंचे १००,२००,व ३००फुट ताब्यांचे वायर चोरीस गेले असुन शेतकऱ्यांचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याने या केबल,स्टाटर चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी तपास करुण शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा,व चोरट्यांना गजाआड करण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी अमडापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.तर याबाबतची सविस्तर तक्रार देखील शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन कडे दाखल केली आहे.याचा तपास ठाणेदार यांनी बिट अमलदार तोंडे यांच्याकडे दिला असुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.यावेळी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,संतोष शेळके,साहेबराव मुरकुटे,भारत मुरकुटे,किसन शिंगणे,भिकाजी ढोरे,गजानन मुरकुटे,विश्वास फाटे,समाधान पाटील,अरुण मुरकुटे,पांडुरंग भुसारी(तंटामुक्ती अध्यक्ष),बद्री मुरकुटे,शे.बबलु,

प्रमोद ढोरे यांच्यासह आदि शेतकरी उपस्थित होते.

English Summary: Give justice to the farmers who are trying to save the thieves
Published on: 20 March 2022, 12:49 IST