News

मुंबई - देशात कोरोना व्हायसरने थैमान घातले असून आतापर्यंत ७४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान देशात या व्हारसचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात कामे उद्योग बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना मोठी झळ पोहचली आहे.

Updated on 13 May, 2020 6:21 PM IST

मुंबई-  देशात कोरोना व्हायसरने थैमान घातले आहे. आता पर्यंत ७४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान देशात या व्हारसचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात कामे उद्योग बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना मोठी झळ पोहचली आहे. इतर राज्यात अडकलेले मजूर आपआपल्या घरी जात आहेत. महाराष्ट्रात असलेले इतर राज्यातील मजूरांनीही आपल्या घराचा रस्ता पकडला आहे. यामुळे पुढील काळात मजुरांची तुटवडा वाढणार आहे. दरम्यान उद्योग व्यवसायातील परप्रांतीय मजुरांच्या जागेवर राज्यातील युवकांना काम द्यावे अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सुरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पाहा व स्थानिकांना काम उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

१७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे. पावसाळाही लवकरच सुरू होणार असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल या दृष्टीने खासगी डॉक्टर्सना ते नियमितरीत्या आपल्या सेवा सुरू करतील हे पाहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्या-जिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत, असे सांगून कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, या झोनमधून विषाणू बाहेर जाणार नाही याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

English Summary: give jobs to maharashtrian people replacement of outsiders - cm
Published on: 13 May 2020, 06:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)