महाराष्ट्र शासनाचे विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. मात्र कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे लाभ दिले जात नाहीत. त्यामुळे इतर पुरस्कार मिळाल्याप्रमाणे कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना शासनाने लाभ द्यावेत अशी मागणी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मालेगाव येथे शेतकऱ्यांनी भुसे यांची भेट घेऊन संबंधित मागणी केली. यावर या मागणीवर सरकार गांभीर्याने विचार करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाकडून विविध क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविले जाते. अशा व्यक्तींना एसटीच्या मोफत प्रवासाचा सह अन्य प्रकारचे योजनांचा फायदा मिळतो. परंतु कृषी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनाच हे लाभ दिले जात नाही. महाराष्ट्र राज्य कृषी विभागात शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो तरीही पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना मात्र अन्य लाभांपासून वंचित ठेवत आहेत.
पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचा कौशल्याचा उपयोग इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी एसटीच्या प्रवासाची मोफत सवलत द्यावी. तसेच टोल माफी मध्ये सवलत मिळावी. शासन आत्मा'अंतर्गत शेतीमित्र नियुक्त करते, यामध्ये कृषी पुरस्कार धारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे, तालुक्यात स्तरापासून ते राज्य पातळीपर्यंत कृषी विभागाच्या विविध समित्यांवर प्राधान्य देण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे करण्यात आली. कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना सरकारच्या इतर पुरस्कार मिळालेल्या प्रमाणे सवलती मिळाल्या तर हा राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय राहील. आणि अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा आधार मिळेल अशी भावना पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांकडे कडे व्यक्त केली.
Published on: 09 November 2020, 04:28 IST