सध्या ऊस गळीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी असताना उसाच्या दरावरून वातावरण तापलं आहे. गतवर्षीच्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन एक हजार रुपये मिळावा. याबरोबर या वर्षी पुरवठा करण्यात येणाऱ्या उसाला प्रतिटनास पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
अन्यथा साखर, दूध आणि शेती मालही अडवू, असा इशारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी संघटनेतर्फे ऊस परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, शेतकऱ्यांना दर द्या, अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करा. काही संघटनांना हाताशी धरून साखर कारखानदारांनी दहा वर्षांपूर्वी केलेल्या एफआरपी कायद्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
तसेच शेतकऱ्यांना कर्जातून आणि वीज बिलातून मुक्त करा, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा, गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळाची प्रतिटन दहा रुपये होणारी कपात रद्द करा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
यावेळी शिवाजी नांदखिले, शर्वरी पवार, लक्ष्मण पाटील, नंदकुमार पाटील, महादेव कोरे, मधुकर पाटील, जयकुमार भाट, श्रीकांत घाटगे उपस्थित होते. यामुळे येणाऱ्या काळात ऊस दरावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
बोगस विमा धारक व त्यांना विमा उतरवून देणारे यांच्यावर कडक कारवाई, कृषी मंत्र्यांचे आदेश..
Published on: 10 October 2023, 12:43 IST