News

केंद्राच्या वादग्रस्त नवीन कृषीकायद्याच्या विरोधात गेल्या वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बरेच शेतकरी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी व सदर शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत केली.

Updated on 08 December, 2021 12:31 PM IST

केंद्राच्या वादग्रस्त नवीन कृषीकायद्याच्या विरोधात गेल्या वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर  शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बरेच शेतकरी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी व सदर शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत केली.

यावेळी ते म्हणाले की, मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यांचा आकडा आपल्याकडे नसल्याचे सांगून केंद्रसरकार या विषयातून पळ काढत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी 500 शहीद शेतकऱ्यांची यादी संसदेच्या पटलावर सादर केली.

 कृषी कायद्याच्या विरोधातील झालेल्या आंदोलनात शेतकरी शहीद झाल्याचे सगळ्या देशाला माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजदार देशाची व शेतकऱ्यांची माफी मागत आपली चूक स्वीकारल्याचे  नमूद करत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई वकुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली.

या बाबतीत 30 नोव्हेंबर ला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले होते की शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा सरकारकडे नाही. परंतु आम्ही या शेतकऱ्यांची  ओळख पटवली आहे. पंजाब सरकारने राज्यात जवळपास चारशे शेतकऱ्यांच्या  कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. 

यापैकी 152 शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देखील देण्यात आली आहे. तसेच हरियाणा राज्यातील 70 शेतकऱ्यांची देखील एक यादी आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचा हक्क देण्यात यावा अशी ठाम मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली.

English Summary: give compansation to dead farmer in farmer protest demand to rahul gandhi at goverment
Published on: 08 December 2021, 12:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)