आपल्या मोबाईलमध्ये पैसे नसले तर आपण दुसऱ्या व्यक्तीला मिस कॉल देऊन त्यांच्याशी संपर्क साधत असतो. म्हणजेच आपण मिस कॉल देऊन कॉल मिळवत होता याच मिस कॉलने तुम्ही घरी सिलेंडर मिळवू शकणार आहात..
फक्त यासाठी तुम्हाला गॅस कंपनीच्या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. इंडियन ओईलकडून आता आपल्या एलपीजी गॅसधारकांसाठी नवीन प्रकारची सुविधा लागू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता ग्राहकांना केवळ एक मिस कॉल देऊन आपला गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. इंडियन ऑइलकडून नुकतीच या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल.
हेही वाचा : ऐकलं का!सिलेंडर मिळेल फक्त 200 रुपयात , पेटीएमची भन्नाट कॅशबॅक ऑफर
जर तुम्ही फोनवरून गॅस बुकिंग करत असाल तर तुम्हाला कॉलसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. सध्याच्या आयव्हीआरएस कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. परंतु आताच्या नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्तींना आणि आयव्हीआरएस प्रणालीत अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.
या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून भुवनेश्वर येथील कार्यक्रमात करण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रिमियम ग्रेड पेट्रोल हे उत्पादनही सादर केले. इंडियन ऑइलकडून एक्सपी १०० ब्रँड अंतर्गत पेट्रोलची विक्री केली जाईल.
मिस कॉलची सुविधा कशी वापराल? How to use Miss Call facility?
या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला फक्त हे स्पष्ट करावे लागेल. रिफील बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून 8454955555 या नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल, त्यानंतर तुम्हाला गॅस बुक झाल्याचा मेसेज येईल.
सिलेंडरची डिलिव्हरी एका दिवसात कशी होईल, याला प्राधान्य देण्याच्या सूचना धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात केल्या.
Published on: 06 January 2021, 04:28 IST