भिवंडी, ठाणे : नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची एक बातमी समोर आली आहे. भिवंडीत म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघकीस झाल्यानंतर महानगरपालिकेने कारखानावर छापा टाकून कत्तलखाना बंद केला आहे. याबाबत महापालिकेने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडीत बंद पडलेल्या कत्तलखानात हा प्रकार भर दिवसा सुरु होता. रेडा आणि म्हैस कापल्यानंतर त्यातून बाहेर टाकण्यात येणाऱ्या अवशेषापासून हे तूप बनवले जात होते. जनावरांचे फेकून दिलेले अवशेष गोळा करुन ते वाळवले जात होते आणि त्यापासून तूप निर्मिती केली जात होती. या तुपाचा विविध खानावळी आणि हॉटेल्सना पुरवठा सुरू होता.
भिवंडी महापालिका प्रशासनाला याबाबत अनेक तक्रारी देण्यात आल्या होत्या. यामुळे महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी मंगळवारी (दि.२) कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत बनावट तुपाचे डबे आणि तूप बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. कापलेल्या जनावरांचे फेकून दिलेले अवशेषापासून हे तूप बनवले जात होते.
भिवंडीतील इदगाह साल्टर हाऊस येथे चरबीपासून तूप बनवण्याचे काम सुरु होते. या भागात बंद पडलेला कत्तलखाना आहे त्याठिकाणी ही तूपनिर्मिती केली जात होती. याबाबत पालिका पर्यावरण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे यांनी पालिका पथकासह या ठिकाणी कारवाई केली.
दरम्यान, या कारवाई महानगरपालिकेने भट्टीवरील कढई, किलो वजनाचे २० डबे असे साहित्य जप्त केले आहे. तसंच कढईत तयार करण्यात येत असलेले तूप देखील फेकून देण्यात आले आहे. तसंच नागरिकांना विश्वासाच्या ठिकाणाहून यापुढे खरेदी करावी, असं आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
Published on: 03 January 2024, 03:16 IST