गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे. ही वाढलेली रुग्ण संख्या पाहता लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. या लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने एक योजना आणली आहे.
या योजनेअंतर्गत ज्या लोकांनी लगेच घेतली आहे, त्यांना त्यांच्या एफडी वर जास्त व्याज मिळेल.नेमकी ही योजना काय आहे? त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
काय आहे ही योजना?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया फिक्स डिपॉझिट स्कीम लॉन्च केली आहे. या योजनेचे नाव इम्युन इंडिया डिपॉझिट असा ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत फिक्स डिपॉझिट केल्यावर ग्राहकांना चालू व्याजदरावर 0.25टक्के जास्त लाभ मिळेल. या योजनेचा फायदा हा कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीलाच होईल. अशा व्यक्तींना चालू व्याजदरापेक्षा 0.25 टक्के जास्त व्याज मिळेल.तसेच कोरोना लस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 0. 50 टक्के जास्त व्याज दिले जाईल.
बँकेने का सोशल मीडिया मध्ये केलेल्या पोस्ट द्वारे या योजना बद्दल माहिती दिली आहे. योजना बँकेने ठराविक काळासाठी लॉन्च केली आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड हा 1111 दिवसांचा आहे.योजना ठराविक काळासाठी लॉंच करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी योजना लॉन्च केली आहे.
Published on: 13 April 2021, 11:49 IST