1. बातम्या

सोलर रूफटॉप सबसिडी योजना,मिळेल वीस वर्ष मोफत वीज

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला पोहोचले आहेत.या वाढल्याचं त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे इंधनाच्या क्षेत्रातील वाढती मागणी सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-tata power

courtesy-tata power

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला पोहोचले आहेत.या वाढल्याचं त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे इंधनाच्या क्षेत्रातील वाढती मागणी सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

 तसेच विजेच्या दरात आणि सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.या वाढत्या दरावरउपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने सोलार रूफटॉपसबसिडी योजना सुरु केली आहे.

 सूर्य हा कधीही न संपणारा उर्जास्त्रोत आहे. त्या माध्यमातून  देशात कधीही न संपणारी सौर ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र शासनाने ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून सोलररूफटॉपबसवण्यासाठी अनुदान देणार आहे.

तीन किलो वॅट पर्यंत सौररूप टॉप पॅनेल स्थापित करण्यासाठी 40 टक्‍क्‍यांपर्यंतअनुदान देण्यात येणार आहे. तीन किलो वॅट ते दहा किलो वॅट पर्यंत वीस टक्के सबसिडी मिळणार आहे.

 सोलर रूफटॉपसबसिडी योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉफ बसवून  विजेचा खर्च 30 ते 50 टक्‍क्‍यांनी कमी करणे शक्‍य होणार आहे. या अंतर्गत 25 वर्षासाठी वीज पुरवण्यात येईल आणि या योजनेतील खर्च पाच ते सहा वर्षात  दिला जाईल.

त्यानंतर पुढील 19 ते 20 वर्षे सौरऊर्जेवरील मोफत विजेचा  लाभ देखील मिळेल. सौर ऊर्जा साठी लागणारे आवश्यक सोलर पॅनल बसवण्यासाठी घराच्या किंवा फॅक्टरीच्या छतावर एक किलोवॅट सौर ऊर्जेसाठी 100 चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. (संदर्भ–मराठी कॉर्नर)

English Summary: get twenty year free electricity through solar roof top scheme Published on: 15 December 2021, 09:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters