News

सध्याचे युग इंटरनेटचे युग असून या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फार कार्यप्रवण आहे. एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत जर सगळ्यांनी आवाज उठवायचा ठरवला तर सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. फक्त सोशल मिडीयाचा वापर हा तितकाच परिणामकारकपणे आणि चांगल्या प्रश्नांसाठी करणे गरजेचे आहे.

Updated on 27 October, 2022 4:03 PM IST

सध्याचे युग इंटरनेटचे युग असून या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फार कार्यप्रवण आहे. एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत जर सगळ्यांनी आवाज उठवायचा ठरवला तर सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. फक्त सोशल मिडीयाचा वापर हा तितकाच परिणामकारकपणे आणि चांगल्या प्रश्‍नांसाठी करणे गरजेचे आहे.

याच बाबीचा सध्या प्रत्यंतर आला असून एखाद्या प्रश्नासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तेच रास्ता रोको किंवा काळे झेंडे दाखवणे, मोर्चा वगैरे इत्यादी गोष्टी बाजूला सारून शेतकऱ्यांच्या मुलांनी ओला दुष्काळसंबंधी एक ऑनलाइन ट्रेंड पुकारला होता.

नक्की वाचा:सूतगिरणीच्या निवडणुकीतून बड्या नेत्यांची माघार, निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष..

या ट्रेंडला समाजातील बुद्धिजीवी वर्ग तसेच विचारवंत,तरुण शेतकरी, पत्रकार इत्यादी व्यक्तींकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे हा ट्रेंड यशस्वी झाला आहे.

तरुणांच्या या ट्रेंडच्या माध्यमातून ज्या काही भावना व्यक्त केल्या गेल्या त्याची योग्य दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल असा इशारा देखील या ट्रेंडच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

नक्की वाचा:ऊस दराचे आंदोलन पेटले, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ट्रॅक्टरचे टायर फोडले..

 या पार्श्वभूमीवर किसान सभेचे राज्य अधिवेशन 31 ऑक्‍टोबर आणि दोन नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात होत असून या अधिवेशनाला राज्याचे नेतृत्व राज्यभरातील निवडलेली असे 300 प्रतिनिधी एकत्र जमणार आहेत. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची एक जाहीर सभा होणार असून शेतकऱ्यांच्या मुलांनी जो काही आज ओला दुष्काळ यासंबंधी ऑनलाइन ट्रेंड पुकारला होता.

त्याची योग्य दखल सरकारने घेतली नाही तर या अधिवेशनात विचारविनिमय केला जाईल व राज्यात आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.

नक्की वाचा:बिग ब्रेकिंग! -पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत..

English Summary: get so many response to online trend of farmer son about heavy rain crop damage situation
Published on: 27 October 2022, 04:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)