कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले. यात अनेकांचा रोजगार गेल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान आज केंद्र सरकारन विस्थापित मजुरांसाठी गरीब कल्याण रोजगार योजना सुरू केली. यामुळे मजुरांना त्याच्या गावातच काम मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान कंपन्यामधून कामगार माघारी गेल्यानंतर कारखाने आणि उद्योग मालकांना कुशल कामगिरांचा अभाव जाणवत आहे. कुशल कामगार नसल्याने कारखानदार चिंतेत आहे. तर दुसरीकडे काम नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने याविषयी कामाविषयी आणि कामगारांविषयी माहिती देणारी वेबसाईट लॉन्च केली आहे.
लॉकडाउननंतर कामगारांच्या स्थलांतरामुळे उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील नोकरीसाठी इच्छूक बेरोजगारांच्या रोजगाराची उपलब्धता आणि उद्योगांना कुशल मानव संसाधनाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यासाठी राज्याच्या कौशल विकास विभागाने www.mahaswayam.gov.in वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटवर बेरोजगार तरुणांना राज्यातील उद्योगांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळू शकेल. यासंदर्भात काही अडचण आल्यास जिल्हा सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधता येईल. यासह एक मोबाईल एप ही काढण्यात आले आहे.
त्यातून रुग्णालयातील बेडची माहिती मिळणार आहे. हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची उपलब्धतेची माहिती मुंबईकरांना आता मोबाईल अॅपवर मिळू शकेल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'एअर-व्हेंटी' नावाचे अॅप लाँच करताना आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत होईल असे सांगितले. त्या म्हणाल्या की, अॅप शहराच्या आपत्ती नियंत्रण कक्षाच्या डॅशबोर्डशी जोडला गेला असून त्याची लिंक मुंबई महानगरपालिकेच्या अॅपद्वारेही मिळू शकेल.
Published on: 20 June 2020, 05:20 IST