News

गावातील महिलांसाठी एक ही बातमी फार महत्त्वाची आहे. विशेषत ज्या महिलां लोणचं बनविण्यात माहिर आहेत. आणि जर आपल्या हाताला लोणचं बनविण्याची कला अवगत असेल तर ही बातमी नक्की वाचा.

Updated on 25 April, 2020 10:40 AM IST


गावातील महिलांसाठी एक ही बातमी फार महत्त्वाची आहे. विशेषत ज्या महिला  लोणचं बनविण्यात माहिर आहेत. आणि  जर आपल्या हाताला लोणचं बनविण्याची कला अवगत असेल तर ही बातमी नक्की वाचा. या बातमीतून तुम्हाला नक्की फायदा होणार,  जर तुम्हाला लोणचं बनवून त्यात पैसा कमावयाचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय उभारायचा आहे तर, तुम्ही लोणचं बनविण्याच्या व्यवसायातून चांगला पैसा कमावू शकता.

छोट्या पातळीवर सुरू करा आपला व्यवसाय

लोणचं बनिवण्याचं काम सुरू करण्याआधी छोट्या छोट्या म्हणजे कमी प्रमाणात लोणचं बनवा.  भारतातील सर्वच राज्यात लोणचं खाल्ले जाते. लोणच्याला सर्वच राज्यात मागणी असते.  यामुळे लोणचं बनविण्याचा व्यवसाय टाकून पैसा कमावण्याचा मार्ग उत्तम मार्ग आहे.  विशेष म्हणजे हा इतर दुसऱ्या व्यवसायासारखा हंगामी नाही.  लोणच्याची मागणी प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक हंगामात असते.  कैरीच्या लोणच्याप्रमाणे लसूण, मुळा, मिरची, गाजर, नींबू, आवळा, अद्ररक, चिंच यापासून बनलेल्या लोणच्यालाही अधिक मागणी आहे.

कमीत कमी जागेत होतो व्यवसाय सुरू

एका खोलीत हा व्यवसाय तुम्ही सुरू करु शकता. फक्त तुमच्याकडे लोणंची तयार करून त्याला सुकवण्यासाठी आणि पॅक करण्यासाठी साधने हवीत.  ज्या जागेवर आपण लोणंचे तयार करत आहोत ती जागा स्वच्छ आहे का याची खात्री करावी.  हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एफएसएसएआयकडून परवाना घ्यावा लागतो. ए फएसएसएआयचा परवाना तुम्ही ऑनलाईन डाऊनलोड करू शकता.

डाऊनलोड केल्यानंतर एक अर्ज असेल त्यात आपली माहिती द्यावी लागेल. नाव, जागा, पत्ता, मोबाईल नंबर, व्यवसायाचा प्रकार आदीची माहिती द्यावी लागेल. अर्ज भरण्यासाठी आपण https://www.fssailicense.org/ लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर अर्ज डाऊनलोड करून आपला अर्ज रू शकता. दरम्यान याविषयीची अधिक माहितीसाठी 9999882732 नंबरवर संपर्क साधावा.

English Summary: get online license of fssai and start your on pickel business
Published on: 25 April 2020, 10:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)