राज्यातील शेतकरी आपल्या इतर पिकांबरोबर आंतरपीक म्हणून मूगाचे उत्पादन घेत असतात. मूगसाठी पाण्याबरोबर, हवामान, तापमान, आदींचे प्रमाण योग्य असावे लागते. बऱ्याच वेळा मूगच्या पीकावर रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असतो. य़ामुळे मूगाचे उत्पादन कमी होत असते. यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या मूगाची लागवड केली पाहिजे. आज आपण अशाच एका प्रकारच्या मूगविषयी जाणून घेणार आहोत. ज्याच्या पेरणीने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार नाही शिवाय उत्पन्नदेखील चांगले असेल. या वाणाची पेरणी केल्यास येणाऱ्या पिकापासून रोगराई दूर राहिल. आम्ही सांगत आहोत त्या मूग वाणचे नाव आहे, कल्याणी. कल्याणी मूगाची लागवड शेतकऱ्यांनी केली तर बळीराजाचे नुकसान होणार नाही. यासह उत्पन्नही भरभरून येईल.
कल्याणी वाणाचे वैशिष्ट्ये -
या वाणाला वाराणसीच्या कुदरत कृषी शोध संस्थेद्वारा तयार करण्यात आले आहे. साधारणपणे मूगाचे पीक ६५ ते ७० दिवसात तयार होत असतं. पंरतु कुदरत कृषी शोध संस्थेद्वारा तयार करण्यात आलेल्या वाणाचे मूग फक्त ५० ते ५५ दिवसात तयार होत असतं. यामुळे याला प्रगत जातीच्या श्रेणीमध्ये ठेवले आहे. या वाणचे वैशिष्ट्य म्हणजे फ्लेक्स लांब असतील आणि शेंग हिरव्या असतील. ही वाण पिकाला अनेक कीटक व आजारांपासून वाचवते. विशेष म्हणजे ही पेरणी करुन पिकामध्ये कोणत्याही रोगाचा धोका नसतो.
अनेक राज्यातील शेतकरी करतात या वाणाचे लागवड
मूगच्या कल्याणी वाणची लागवड उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र. मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, बंगाल, छत्तीसगड, पंजाबसह अनेक राज्यात याची लागवड होते. य़ा वाणाची लागवड केल्यास किंवा शेती केल्यास साधरण एक एकराच्या क्षेत्रात ६ ते ७ क्किंटलचे उत्पादन मिळते. ही बी प्रति एकराच्या शेताला कमीत कमी ६ किलो लागत असते. या वाणाच्या पेरणीने शेतीच्या सुपीकतेमध्ये वाढ होत असते. पिकाच्या कापणीनंतर हिरवे खत देखील मिळत असते.
अशी करा कल्याणी वाणची पेरणी
या जातीच्या मुगाच्या लागवडीसाठी प्रथम बी पेरणी करावी लागेल. यासाठी, बियाणे राइझोबियम कल्चरने उपचार करा. यानंतर बियाणे सावलीत वाळवा आणि नंतर बियाणे पेरणी करा. हंगामात दर हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे पेरणी करावी. यावेळी रांगांचे अंतर सुमारे २० ते २५ सेमी असावे. खरिपाच्या हंगामाबद्दल सांगायचे झाले तर प्रति हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पेरले पाहिजे. ज्यामध्ये रांगाचे म्हणजे वाफ्यांचे अंतर सुमारे ३० आणि वनस्पतींचे अंतर ४ सेमी आहे. यावेळी रब्बी पिकाची कापणी झाल्यानंतर शेतकरी डाळीकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत आपण या मुगाची पेरणी करुन चांगला नफा कमवू शकता.
Published on: 21 April 2020, 11:59 IST