News

आता घरबसल्या शेतमालाची आवक आणि बाजारभाव याची माहिती कळणार आहे. बाजारसमिती मधील मालाची योग्य आवक आणि योग्य बाजारभाव यांची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. याबाबतचा निर्णय कृषी पणन मंडळाने घेतला आहे.

Updated on 31 January, 2022 10:43 AM IST

आता घरबसल्या शेतमालाची आवक आणि बाजारभाव (Market price) याची माहिती कळणार आहे. बाजारसमिती (Market Committee) मधील मालाची योग्य आवक आणि योग्य बाजारभाव यांची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. याबाबतचा निर्णय कृषी पणन मंडळाने (Agricultural Marketing Board) घेतला आहे.

कृषी पणन मंडळाच्या ‘एमएसएएमबी' (‘MSAMB) या सुधारित मोबाईल अँपमुळे घरबसल्या शेतमालाची दैनंदिन आवक व बाजारभावाची माहिती मिळणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer manufacturing companies), कृषी पणन मित्र मासिक (Krishi Panan Mitra Magazine), सर्व बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती यावर मिळेल, अशी माहिती पणन संचालक सुनील पवार यांनी दिली.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते अँपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती व आमदार दिलीप मोहिते, सहकार आयुक्त अनिल कवडे, पणन संचालक सुनील पवार, राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (MSAMB), पुणे ची स्थापना 23 मार्च 1984 रोजी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास आणि नियमन) अधिनियम, 1963 च्या कलम 39A अंतर्गत करण्यात आली. एमएसएएमबीने राज्यात कृषी विपणन क्षेत्रात अग्रगण्य कार्य केले आहे. आणि विविध क्षेत्रात यश मिळवले. MSAMB ची महाराष्ट्र राज्यात कृषी विपणन प्रणाली विकसित आणि समन्वयित करण्यात महत्त्वाची भूमिका आहे.

English Summary: Get Income and Market Prices at Home Now
Published on: 31 January 2022, 10:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)