News

भारतात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. गव्हाचे उत्पादन जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेता येते. गव्हाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासुन करण्यात येते, या कालावधी नंतर गव्हाची पेरणी केल्यास जास्त थंडीमुळे उत्पादनात घट होऊ शकते.

Updated on 04 October, 2023 3:06 PM IST

भारतात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. गव्हाचे उत्पादन जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेता येते.गव्हाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासुन करण्यात येते, या कालावधी नंतर गव्हाची पेरणी केल्यास जास्त थंडीमुळे उत्पादनात घट होऊ शकते.खालील काही गव्हाच्या सुधारित जातींच्या उत्पादनातून शेतकरी कमी खर्चात भरघोस नफा कमवू शकतो.

करण नरेंद्र -
गव्हाच्या नवीन आणि सुधारित जातींमध्ये करण नरेंद्रचे नाव अग्रस्थानी घेतले जात आहे. याला DBW-222 असेही म्हणतात, जे पेरणीच्या 143 दिवसांत पिकते. करण नरेंद्र गव्हाच्या जातीची लागवड केल्यास हेक्टरी ६५ ते ८२ क्विंटल उत्पादन घेता येऊ शकते. या जातीची विशेष गोष्ट म्हणजे इतर गव्हाच्या वाणांच्या तुलनेत करण नरेंद्र हे फक्त 4 सिंचनात तयार होते.
करण वंदना -
करण वंदना जातीला DBW-187 या नावाने देखील ओळखले जाते. हा गव्हाची रोग प्रतिरोधक जात आहे, करण वंदना जातीचे पेरणीच्या १२० दिवसांनंतर प्रति हेक्टरी ७५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळु शकते. ICAR-IIWBR च्या शास्त्रज्ञांच्या मते, गंगेच्या किनाऱ्या लगतच्या भागात या जातीचे दर्जेदार उत्पादन मिळू शकते.

करण श्रिया -
करण श्रिया म्हणजेच DBW-252 या जातीला लागवडीसाठी जास्त पाणी लागत नाही, परंतु केवळ एका सिंचनातही ही जात 55 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देते. करण श्रिया या जातीसह पेरणी केल्यास केवळ १२७ दिवसांत बंपर उत्पादन मिळू शकते. भारतीय कृषी संशोधन परिषद-भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था ICAR-IIWBR च्या शास्त्रज्ञांच्या मते, करण श्रीया गहू ही आतापर्यंतची सर्वोत्तम नवीनतम जात आहे.
तपोवन -
गव्हाच हे एक उत्कृष्ट सरबती वाण असुन गव्हाची ही एक सुधारित जात असून बागायती क्षेत्रासाठी उत्कृष्ट जात मानली जाते. या गव्हाची वेळेवर पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळते. या जातीच्या गव्हात ओंब्याची संख्या जास्त असते. या जातीच्या गव्हात प्रोटीन साडेबारा टक्के आढळते.
पंचवटी (एनआयडीडब्ल्यू- 15), शरद (एकेडीडब्ल्यू- 2997- 16), नेत्रावती (एनआयएडब्ल्यू- 1415), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू- 295), त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू-301), एमएसीएस- 6222, एनआयएडब्ल्यू- 34, एकेएडब्ल्यू- 4627, DBW-370, DBW-371, DBW-372 या देखील गव्हाच्या काही सुधारित जाती असुन या दर्जेदार उत्पादन मिळवुन देतात.

English Summary: Get huge profits from this improved variety of wheat production
Published on: 04 October 2023, 03:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)