News

मुंबई: राज्यातील महिला बचतगटांमार्फत उत्पादित होणारी विविध उत्पादने आता ॲमेझॉनवर मिळणार आहेत. बचतगटांमार्फत उत्पादित झालेल्या ज्वेलरी, तूप, वेफर्स, कोसा सिल्क, तोरण, मसाले, चटण्या आदी विविध प्रकारच्या सुमारे 150 उत्पादनांचे आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ॲमेझॉन सहेली संकेतस्थळावर लाँचिंग करण्यात आले. ई-कॉमर्सच्या माध्यमातून राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ॲमेझॉन आणि महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये (माविम) झालेली आजची भागीदारी फार महत्त्वपूर्ण ठरेल, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Updated on 26 October, 2018 7:55 AM IST


मुंबई:
राज्यातील महिला बचतगटांमार्फत उत्पादित होणारी विविध उत्पादने आता ॲमेझॉनवर मिळणार आहेत. बचतगटांमार्फत उत्पादित झालेल्या ज्वेलरी, तूप, वेफर्स, कोसा सिल्क, तोरण, मसाले, चटण्या आदी विविध प्रकारच्या सुमारे 150 उत्पादनांचे आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ॲमेझॉन सहेली संकेतस्थळावर लाँचिंग करण्यात आले. ई-कॉमर्सच्या माध्यमातून राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ॲमेझॉन आणि महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये (माविम) झालेली आजची भागीदारी फार महत्त्वपूर्ण ठरेल, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी पंकजा मुंडे यांनी बचतगटाद्वारे उत्पादित झालेल्या वस्तूची थेट ॲमेझॉन सहेलीच्या संकेतस्थळावर जाऊन खरेदी केली. टस्सर सिल्कचा स्टोल (दुपट्टा) खरेदी करुन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या या ऑनलाईन चळवळीचा त्यांनी शुभारंभ केला. माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, ॲमेझॉनचे विपणन प्रमुख सतिश उपाध्याय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. माविममार्फत आज शक्ती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या अनुषंगाने ॲमेझॉन समवेतची भागिदारी अधिक बळकट करण्यात आली. याशिवाय एमकेसीएल, बुक माय बाई डॉट कॉम, उर्वी ॲग्रोटेक यांच्याबरोबरही विविध सामंजस्य करार करण्यात आले.

मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, महिला जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाहीत, तोपर्यंत त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ शकणार नाही. त्यामुळेच राज्य शासनाने माविम आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून बचतगटांच्या चळवळीला गती दिली आहे. ॲमेझॉनबरोबर भागीदारी करुन राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांना आता जागतिक बाजारपेठ मिळेल. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले आजचे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ॲमेझॉनचे विपणन प्रमुख सतिश उपाध्याय यावेळी म्हणाले की, ॲमेझॉनच्या सहेली साईटवर देशभरातील जवळपास १ लाख महिला उद्योजकांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 2020 पर्यंत महिला उद्योजकांची ही संख्या 10 लाखापर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने माविमबरोबर आज झालेली भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बचतगटांची उत्पादने आम्ही ॲमेझॉन सहेलीवर लाँच करु, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे म्हणाल्या की, महिला बचतगटांच्या ज्या महिला पूर्वी रस्त्यावर बसून किंवा प्रदर्शनात आपली उत्पादने विकत होत्या त्यांना आजच्या भागीदारीमुळे जागतिक बाजारपेठ घरबसल्या उपलब्ध होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ॲमेझॉनबरोबरची भागीदारी क्रांतिकारी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी इस्राईलचे कौन्सिल जनरल याकोव्ह फिनकल्स्टेन, नाबार्डचे सरव्यवस्थापक यु. डी. शिरसाळकर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार, प्रिया खान, माविमच्या सरव्यवस्थापक कुसुम बाळसराफ, महिला बालविकास विभागाच्या उपसचिव स्मिता निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

English Summary: get global market to women self help groups products through e-commerce
Published on: 26 October 2018, 07:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)